अखेरच्या सामन्यात भारतीय संघाची अचूक आणि भेदक गोलंदाजी, दणदणीत विजयासाठी टीम इंडिया सज्ज


दुबई : भारतीय ंसघाने आपल्या अखेरच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक आणि अचूक मारा करत नामिबियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला आणि त्यामुळेच नामिबियाला भारतापुढे १३३ धावांचे माफक आव्हान ठेवता आले.

भारताचा हा अखेरचा सामना असला तरी कर्मधार विराट कोहलीने टॉस जिंकत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. कोहलीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली. कोहलीचा हा निर्णय योग्य असल्याचे भारताच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. भारताकडून यावेळी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. कारण या दोघांनी या सामन्यात प्रत्येकी तीन विकेट्स मिळवले. जडेजाने या सामन्यात चर षटकांमध्ये फक्त १६ धावा देत, तीन विकेट्स पटकावले. दुसरीकडे अश्विनने आपल्या चार षटकांमध्ये २० धावा दिल्या आणि तीन फलंदाजांना बाद केले. अश्विन आणि जडेजा या सामन्यात यशस्वी ठरत असले तरी भारताचा तिसरा फिरकीपटू राहुल चहर मात्र अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. चहरला या सामन्यात विश्वचषकात पहिल्यांदाच संधी मिळाली होती. आजच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला संघाबाहेर ठेवत चहरला संघात स्थान दिले होते. पण चहरला या सामन्या एकही विकेट मिळवता आली नाही. चहरने या सामन्यात चार षटकांमध्ये ३० धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आला नाही.

नामिबियाच्या संघाने यावेळी भारताविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. नामिबियाने यावेळी ३३ धावांची सलामी दिली. त्यावेळी नामिबियाचा संघ मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि नामिबियाच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. अश्विन आणि जडेजा यांनी यावेळी मोलाची जबाबदारी पार पाडल्याचे पाहायला मिळाले. नामिबियाच्या डेव्हिड वीसने यावेळी मध्यल्या फळीत खेळताना चांगली फलंदाजी केली, त्यामुळेच नामिबियाच्या संघाला यावेळी धावांचे शतक पूर्ण करता आल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघासाठी हे माफक आव्हान समजले जात आहे. त्यामुळे भारत आजच्या सामन्यात कसा विजय मिळवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: