coronavirus update: राज्याला मोठा दिलासा; करोनाच्या रुग्णवाढीचा आलेख घसरतोय, मृत्यूही घटले


मुंबई: राज्यात आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. तसेच मृत्यूसंख्याही घटल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ७५१ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ८९२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण १ हजार ५५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ०६३ इतकी होती. तर, आजही १५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १६ इतकी होती. (maharashtra registered 751 new cases in a day with 1555 patients recovered and 15 deaths today)

आज राज्यात झालेल्या १५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ६० हजार ६६३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई; उचलले ‘हे’ कठोर पाऊल

मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ६४९ इतकी आहे. या बरोबरच राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा विचार करता सर्वात जास्त रुग्णवाढ आज मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत एकूण २०६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात आज ७० नवे रुग्ण वाढले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात ही संख्या ४६ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- कोर्टाचा अवमान करून संप चिघळवणार असतील तर…; मंत्री अनिल परब यांचा ‘हा’ इशारा

त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण २१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. रायगडमध्ये ही संख्या १० इतकी आहे.

नाशिकमध्ये २३, सोलापुरात १४, साताऱ्यात ही संख्या ११, कोल्हापुरात ३, सांगलीत ८ तर रत्नागिरीत ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

तसेच औरंगाबादमध्ये आज ६ नवे रुग्ण आढळले असून जालना, लातूर आणि अकोल्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

तर, उस्मानाबादमध्ये ५, बीडमध्ये ७ रुग्ण आढळले आहेत. नागपूर मनपाक्षेत्रात २, अमरावती मनपाक्षेत्रात ३ रुग्ण आढळले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- दोन संशयितांनी अंबानींच्या ‘अँटिलिया’चा पत्ता विचारला; उडाली खळबळ, परिसरात नाकाबंदी

१,३८,१७९ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ३३ लाख ०२ हजार ४८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख १८ हजार ३४७ (१०.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३८ हजार १७९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ८६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: