आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते दोन मजली शाॅपींग सेंटरच्या कामाचे भूमीपूजन
कुर्डुवाडी /प्रतिनिधी,दि.७/११/२०२१ : महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून कुर्डुवाडी नगरपरिषदेस मिळालेल्या ७० लाखाच्या निधीतून दोन मजली शाॅपींग सेंटरच्या कामाचे भूमीपूजन पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करमाळा कुर्डुवाडीचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष समीर मुलाणी,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, हरी बागल,गटनेते बबन बागल,विरोधी पक्षनेते संजय गोरे,नगरसेवक आयुब मुलाणी,अरुण काकडे,निवृत्ती गोरे,आनंद टोणपे, संभाजी सातव,दिलीप सोनवर,नितीन पवार,चंद्रकांत वाघमारे, मनोज धायगुडे,बाबा साळवे, माजी शहरप्रमुख कुमार गव्हाणे,यासिन बहामद,स्वप्नील गवळी,विशाल गोरे,हरिष भराटे, शिवराज घाटगे, ऋषीपाल वाल्मिकी,नागेश मेहेर, कृष्णाई कन्स्ट्रक्शनचे करणसिंह परबत, सुहास गाडेकर ,कार्यालयीन अधिक्षक अतुल शिंदे, बांधकाम विभागाचे जयसिंग लोखंडे, कल्याण बागल आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष समीर मुलाणी म्हणाले की नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीच्या पूर्वेला आरक्षण क्र.७२ मध्ये हे दुमजली व्यापारी संकुल होणार असून यामध्ये ११ गाळे बांधले जाणार आहेत.हा निधी मिळवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,आ.संजयमामा शिंदे, शिवसेना नेते खा राहुल शेवाळे यांचे सहकार्य लाभले .
Like this:
Like Loading...