भीषण अपघात : एका तरुणाचा जागीच मृत्यू; दुसऱ्याने रुग्णालयात सोडले प्राण


हायलाइट्स:

  • नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात
  • अपघातात दोन जण ठार
  • सालोड गावात पसरली शोककळा

अमरावती : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. ऋषिकेश रमेश इंझळकर (वय २१) हा तरूण जागीच ठार झाला असून ऋतीक अनिल धांडे (वय २१) याचा अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादच्या दिशेने नागपूरला तूर घेऊन जात असलेल्या ट्रकने दुसर्‍या ट्रकला ओव्हरटेक करत मंगरूळवरून येत असलेल्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला आहे. अपघात होताच गावातील नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या दोघा युवकांना बाहेर काढले आणि त्यातील एका जखमीला रुग्णालयात उपचारासाठी पाठवून मंगरूळ चवाळा येथील पोलीस स्टेशन येथे घटनेची माहिती दिली.

…तर आग दुर्घटनेत अनेकांचा जीव वाचला असता; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पडधन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

मृतक ऋषिकेश व ऋतीक हे दोघेही काही कामानिमित्त मंगरूळ चवाळा येथे गेले होते. काम आटपून परत आपल्या गावी येत असताच गावाजवळच त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन्ही युवक गावांतील लोकांशी मिळून मिसळून राहत असल्याने संपूर्ण सालोड गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पुढील तपास मंगरूळ चवाळा येथील पोलीस निरीक्षक विवेक पडधन हे करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: