सदोष उपकरणे पुरवणारे तसेच त्रुटी असताना रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करा -डॉ नीलमताई गोऱ्हे

सदोष उपकरणे पुरवणाऱ्या उत्पादकांवर तसेच त्रुटी असतानासुद्धा रुग्णालय सुरू करण्यास ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर कडक कारवाई करा -डॉ नीलमताई गोऱ्हे
 पुणे /मुंबई /डॉ अंकिता शहा,08/11/2021- अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील दि ०६ नोव्हेंबर,२०२१ लागलेल्या आगीच्याबाबतीत ज्या वैद्यकीय उपकरणामुळे (व्हेंटिलेटर) आग लागली अशा सदोष उपकरणे पुरवणाऱ्या उत्पादकांवर कडक कारवाई करावा तसेच फायर ऑडिटमध्ये त्रुटी असतानासुद्धा रुग्णालय सुरू करण्यास ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दि.६ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या आगीत ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने सर्व रूग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश यापूर्वी दिले होते. परंतु या घटनेत फायर ऑडिटमध्ये त्रुटी असतानासुद्धा इस्पितळ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली ही बाब अतिशय धक्कादायक आहे. या रुग्णालयाची पाहणी मी स्वतः व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत केली असता यातील काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत व अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी मी आपल्याकडे पुढील सूचना करत आहे
यात आग लागण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये बिघाड आली आणि तेथे शॉटसर्किट झाले व आग लागली. याबाबत ज्या कंपनीकडून व्हेंटिलेटर पाठविण्यात आले होते त्या कंपनीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. सदर प्रकरणाची विभागीय व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी चालु आहे यात आरोग्य विभाग अधिकारी, बांधकाम विभाग अधिकारी, इलेक्ट्रिकल विभागातील अधिकारी यांचा समावेश आहे त्यात सदोष बांधकाम व वीज जोडण्यांचा मुद्दा घेण्यात यावा. फायर ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटीबाबत पूर्तता न करताच हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते असे देखील समोर आले आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. अग्नी प्रतिबंधकचे प्रशिक्षण दिले होते असे वारंवार सांगण्यात येते परंतु भंडारा, भांडुप आणि नाशिक येथे लागलेल्या आगीत देखील प्रशिक्षण दिले असते व त्यानंतर जरी दिले असते तर कालची दृघटना रोखता आली असती. रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी तात्काळ SOP तयार करण्याची सूचना प्रशासनास देण्यात यावी तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये फायर ड्रिलचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देणे गरजेचे आहे. एक्सप्रेस फिडरमधून दुसऱ्या हॉस्पिटलला लाईट कनेक्शन देण्यात आले होते त्यामुळे सुद्धा विजेचा दाब कमी जास्त होऊन देखील आग लागण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरमधून वीज जोडणीसाठी NOC देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे.

    तरी वरील बाबींवर तात्काळ आवश्यक ती कार्यवाही होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना उचित आदेश निर्गमित करावेत अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी  महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना केली आहे. तसेच याची प्रत प्रधान सचिव आपत्ती व्यवस्थापन विभाग,मंत्रालय मुंबई यांना दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: