केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी
घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन


पंढरपूर,दि.08/11/2021:- पंढरपूरला जोडणारे पालखी मार्ग व राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे पंढरपुरात आले होते.त्यावेळी केंद्रिय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रिय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार प्रशांत परिचारक,आमदार समाधान आवताडे ,नगराध्यक्षा साधना भोसले , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, केंद्रीय सचिव गिरीधर आरमाने, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, समिती सदस्य ह. भ.प.शिवाजी महाराज मोरे ,अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, माधवी निगडे आदी उपस्थित होते.