पोस्ट ऑफिसमध्ये १००० रुपयांमध्ये खाते उघडा; दरमहा ५ हजार रुपये कमवा, कसे ते जाणून घ्या


हायलाइट्स:

  • पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अकाउंट (POMIS) एक चांगली योजना ठरू शकते.
  • या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.
  • महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पैसे या योजनेत १०० टक्के सुरक्षित राहतील.
  • त्याची परिपक्वता (मॅच्युरिटी) ५ वर्षांची आहे.

मुंबई : जर तुम्हाला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असेल, तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अकाउंट (POMIS) एक चांगली योजना ठरू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पैसे या योजनेत १०० टक्के सुरक्षित राहतील. त्याची परिपक्वता (मॅच्युरिटी) ५ वर्षांची आहे.

पेटीएमच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…
एकल गुंतवणूकदारांना दरमहा किमान २४७५ रुपये किंवा २९,७०० रुपये उत्पन्नाची हमी मिळते, तर जॉईंट अकाउंटमध्ये हा नफा दुप्पट होतो. जर तुम्ही या योजनेत सिंगल खाते उघडले, तर ४.५ लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील. तर जॉईंट अकाउंटद्वारे जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये ६.६ टक्के वार्षिक व्याजाने संपूर्ण वर्षभरात मिळणारी रक्कम १२ महिन्यांत विभागली जाते. प्रत्येक महिन्याला मिळणारी रक्कम हे तुमचे मासिक उत्पन्न असते. योजनेची परिपक्वता ५ वर्षे आहे, पण रिइन्व्हेस्टमेंट अंतर्गत ती आणखी ५ वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते.

युरोपात महाराष्ट्र गौरव! हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी मिळाला पुरस्कार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंती उपस्थिती
किती मिळते व्याज?
– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ६.६ टक्के वार्षिक व्याज देते.
– खाते उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि मुदतपूर्ती होईपर्यंत व्याज देय असेल.
– दरमहा देय असलेल्या व्याजावर खातेदाराने दावा केला नसेल, तर अशा व्याजातून कोणतेही अतिरिक्त व्याज जमा होणार नाही.
– ठेवीदाराने केलेल्या कोणत्याही अतिरिक्त ठेवीच्या बाबतीत, जास्तीची ठेव परत केली जाईल आणि खाते उघडण्याच्या तारखेपासून पैसे काढल्याच्या तारखेपर्यंत फक्त पीओ (PO) बचत खाते व्याज लागू होईल.
– एकाच पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यात ऑटो क्रेडिट किंवा ईसीएसद्वारे व्याज काढले जाऊ शकते.
– ठेवीदाराला मिळणारे व्याज करपात्र आहे.

नोटाबंदीची पाच वर्षे : डिजिटल पेमेंटमध्ये झाली वाढ, वाचा काय सांगतो विशेष अहवाल
MIS खाते कसे उघडायचे?
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे MIS खाते उघडू शकता. पीओएमआयएस (POMIS) फॉर्म भरताना तुम्हाला ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, २ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक असतील. फॉर्म भरताना साक्षीदाराची देखील आवश्यकता असेल. फॉर्मसह खाते उघडण्यासाठी ठरलेल्या रकमेसाठी रोख किंवा चेक जमा करा.

दरवर्षी मिळतील ६० हजार रुपये
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एका खात्याद्वारे किमान ४.५ लाख रुपये जमा करू शकता. वार्षिक ६.६ टक्के व्याजदरानुसार या रकमेवर एकूण २९,७०० रुपये व्याज मिळेल. तसेच या योजनेत संयुक्त खात्याद्वारे जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. व्याजदरानुसार या रकमेवर एकूण ५९,४०० रुपये व्याज मिळेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: