PM मोदी म्हणाले, ‘विठ्ठलाला साष्टांग दंडवत…’; मागितले तीन आशीर्वाद


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंढरपूर पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे ऑनलाइनद्वारे भूमिपूजन केले. यावेळी महाराष्ट्राचे, राज्यपाल भगसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, भागवत कराड, रामदास आठवले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साष्टांग दंडवत करत सर्व वैष्णव भक्त आणि वारकऱ्यांना अभिवादन केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.

पंढरपूर आळंदी ( sant dnyaneshawar maharaj palkhi marg ) आणि पंढरपूर देहू या ( sant dnyaneshawar maharaj palkhi marg ) पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केले. ११ हजार कोटींहून अधिक खर्चाची ही चौपदरीकरणाची योजना आहे. पंढरपूर वारीतील वाकऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे चौपदरीकरण हे ५ टप्प्यांत केले जाईल. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पालखी मार्गाच्या विकास योजनेतून विठ्ठलाशी जुळलो. याहून अधिक इश्वरीय कृपेच्या साक्षात्काराचे सौभाग्य आणखी काय असू शकते. संत ज्ञानेश्वार माऊली आणि संत तुकोबारायांच्या पालखी मार्गाचे आज उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद आहे. यातून वारकऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत. रस्ते हे विकासाचे मार्ग असतात असे म्हटले जाते. तसेच हे पालखी मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंच फडकवणारे महामार्ग ठरतील. पवित्र भक्ती मार्गाकडे नेणारे ते महाद्वार ठरेल, असं पंतप्रधान मोदी मरीठातून म्हणाले. ३५० किमीहून अधिकचे हे महामार्ग असतील आणि त्यावर ११ हजार कोटींहून अधिकच्या खर्चाची ही योजना आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला पायी चालणाऱ्या वाकऱ्यांसाठी विशेष मार्ग बांधण्यात येतील हे याचे वैशिष्य आहे. पंढरपूला जोडणाऱ्या २०० किलोमीर राष्ट्रीय महामार्गाचा शुभारंभ झाला आहे, लोकार्पण झाले आहे. यावर किमान १२०० कोटी रुपये खर्च आला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथून येणाऱ्या वारकऱ्यांना या महामार्गाद्वारे मोठी मदत होईल. हे महामार्ग विठ्ठल भक्तांच्या सेवेसह संपूर्ण भागाच्या विकासाच्या मार्गाचे माध्यम ठरेल. याद्वारे दक्षिण भारताची कनेक्टव्हिटी वाढेल आणि भाविकांना पंढरपूरला येणास सुविधा होईल. यासर्व विकासकामाशी जुळलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंढरपूरची वारी आजही जगातील सर्वात प्राचीन यात्रा आहे. एक सामाजिक चळवळ म्हणून पंढरपूर यात्रेचे पाहिले जाते. आषाढी एकादशीला पंढरपूर यात्राचे विहंगम दृश्य कोण विसरेल. हजारो भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढिने चालत असतात. इतिहास पाहता भारतावर आणि महाराष्ट्रावर अनेक हल्ले झाले. शेकडो वर्षे देश गुलामीत होता. नैसर्गित आपत्ती, अनेक कठीण आव्हानं आली. पण विठ्ठालावरील आपली श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही. पंढरपूरची वारी अखंड चालत राहिली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी विविध दिशांनी पालख्या आणि भाविक येतात. आपले विचार वेगवेगळे असू शकतात. पण आपले लक्ष्य एकच आहे. अखेरीस सर्व भागवत पंथाचे आहेत. पंढरपूरला जाणारे पालखी मार्ग वेगवेगळे आहेत. पण त्या सर्वा पालख्या या पंढरपूरात विठ्ठलाच्या पायी एक होतात. ही परंपरा भारताच्या शाश्वत शिक्षणाचे प्रतीक आहे. आपल्या श्रद्धेला घट्ट बांधून ठेवत नाही, तर ती मुक्त करते. विठ्ठालाचे दर्शन सर्वांना खुल आहे. यामुळे सबका साथ-साबका विकास असं मी जेव्हा म्हणतो, त्यामागे हीच भावना असते. ही भावना देशाच्या विकालाला प्रेरणा देते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकासाला चालना देते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला ‘पद्म’ पुरस्कार वितरण सोहळा, देश-विदेशातील ११९ मान्यवरांचा सन्मान

पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा म्हणजे माझ्यासाठी साक्षात श्री नारायणाची सेवा आहे. ही ती भूमी आहे, जिथे अजूनही भगवात प्रत्यक्षात विराजमान आहेत. ही सृष्टी नव्हती तेव्हापासून विठ्ठलाची पंढरी आहे, असं संत नामदेव म्हणाले आहेत, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. उत्तरेत रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानकदेव आणि संत रैदास असे महान संत झाले. तर पूर्वेत चैतन्य महाप्रभू, शंकर देव या संतांनी आपल्या विचारांनी देश समृद्ध केला. दक्षिणेत माध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य आणि पश्चिमेला नरसी मेहता, मीराबाई, धीरो भगत, भोजा भगत, प्रीतम असे महान संत झाले. देशात वेगवेगळ्या भागांमध्ये असे महान संत देशाला दिशा देत राहिले, ही भारताची विशेषता आहे.

पंढरपूर वारीची विशेषता म्हणजे पुरुषांसोबत महिलाही चालतात. ही आपल्या देशाची नारीशक्ती आहे. पंढरपूरची वारी ही संधी निर्माण करणाऱ्या एका समानतेचे प्रतीक आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ हा संदेश या वारीत दिला जातो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी मागितले तीन आशीर्वाद

पालखी मार्गाच्या चौपदरीकरणावेळी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी दाट आणि शितल सावली देणारी झाडे लावावीत. पंढरपूर वारीतील पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असा दुसरा आशीर्वाद पंतप्रधान मोदींनी मागितला. तिसरा आशीर्वाद हा पंढरपूरसाठी आहे. भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वाधिक स्वच्छ तीर्थक्षेत्रांपैकी एक आम्हाला बघायचे आहे. हे काम जनसामान्यांच्या सहभागातूनच होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातूनच ही बाब शक्य आहे. त्यांनी या स्वच्छता अभियानाचं नेतृत्व करावं. तरच आपण हे स्वप्न साकार करू शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: