आजपासून टीम इंडियाची नवी सुरूवात; नव्या कर्णधाराचे आणि टीमचे एकच टार्गेट…


दुबई: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०१९, त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आता टी-२० वर्ल्डकप न्यूझीलंड संघाने ३ वर्षात चौथ्यांदा भारतीय संघाला धक्का दिला. टी-२० वर्ल्डकपमध्ये प्रथम ग्रुप फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानचा पराभव करून भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांवर पाणी फेरले. पुढील म्हणजे २०२२ चा टी-२० वर्ल्डकप देखील तसा तोंडावरच आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताला आजपासून सुरुवात करावी लागणार आहे. टी-२० वर्ल्डकप फायनल झाल्यानंतर ३ दिवसांनी न्यूझीलंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. टी-२० मालिकेत बीसीसीआय काही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते. तर ३ फॉर्मेट सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंना आराम देऊ शकते. जाणून घेऊयात कसा असेल भारताचा नवा संघ….

वाचा- अफगाणिस्तानच्या पराभवानंतर भारताने घेतला मोठा निर्णय; संघ व्यवस्थापनाने रद्द केला…

रोहित शर्मा (कर्णधार)– विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत या पदाासाठी सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे रोहित शर्मा होय. मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळून देणाऱ्या रोहितला त्याची टीम तयार करण्याची सवलत दिली पाहिजे.

ऋतुराज गायकवाड- आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या या युवा फलंदाजाला भारतीय संघात संधी मिळाली नाही तरच नवल. रोहित शर्मा सोबत ऋतुराज सलामीला येऊ शकतो. पॉवर प्लेमध्ये चेंडू सीमारेषे बाहेर कसा पाठवायचा हे त्याला चांगले माहिती आहे.

वाचा- विराट कोहलीच्या त्या एका चुकीने भारताचा घात झाला; अन्य संघ जिंकत होते आणि…

इशान किशन- टी-२० वर्ल्डकपमध्ये इशानला भलेही राखीव सलामीवीर म्हणून निवडले असेल तरी त्याची क्षमता पाहता तो संघात कायमचे स्थान मिळवू शकतो. स्फोटक फलंदाजी सोबत इशान विकेटकीपर म्हणून योगदान देऊ शकतो.

सूर्यकुमार यादव- भारताचा ३६० डिग्री फलंदाज अशी सूर्यची ओळख आहे. बेधडक स्ट्रोक मारणारा अशी त्याची ओळख असून पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात भारताच्या मधळ्या फळीत तो कळीचा फलंदाज ठरू शकतो.

वाचा- IPL का खेळला मग? बीसीसीआयने कोहली अँड कंपनीला फटकारले

श्रेयस अय्यर- आक्रमक आणि बचाव या दोन्ही गोष्टीमध्ये श्रेयस उत्तम फलंदाज आहे. चुकीच्या वेळी दुखापत झाल्याने वर्ल्डकप संघात त्याला स्थान मिळाले नाही. पण त्याला राखीव संघात स्थान दिले गेले होते. भारतीय संघात क्रमांक चारसाठीचा तो सर्वोत्तम पर्याय आहे.

वेंकटेश अय्यर-
आयपीएलच्या २०२१च्या हंगामात भारताला सापडलेला खेळाडू म्हणजे वेंकटेश अय्यर होय. तो फलंदाजीत आक्रमक आहे आणि गोलंदाजी देखील करू शकते. संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर थोडी मेहनत घेतली तर टीमला भविष्यात एक चांगला ऑल राउंडर मिळू शकतो. संघात लोअर मीडल ऑर्डरमध्ये वेंकटेशचा उपयोग होऊ शकतो.

वाचा- कपिल देव संतापले; खेळाडूंना IPL आवडते, देशाकडून खेळण्यास महत्त्व नाही


हर्षल पटेल-
स्लोअर आणि कटर चेंडूने आयपीएलमधील सर्व फलंदाजांना त्रास देणाऱ्या हर्षल भारतीय संघाचे दार उघडण्याची वाट पाहतोय. त्याने २०२१च्या हंगामात सर्वाधिक ३२ विकेट घेण्याचा विक्रम केलाय. न्यूजीलंड दौऱ्यात आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये तो एक चांगला पर्याय असू शकतो.

अक्षर पटेल- वर्ल्डकपसाठी मुख्य संघात निवड झाल्यानंतर अक्षरला पुन्हा राखीव मध्ये टाकण्यात आले. आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या अक्षरच्या फिरकीमध्ये अनेक प्रकार आहेत. चांगला फिल्डर असण्या सोबत तो धावा देखील वेगाने करू शकतो.

दीपक चाहर– पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज गेल्या काही काळात डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी दिसत नाही. स्लोअर बॉलच्या नव्या तंत्रास तो फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.

वाचा- भारतीय संघाच्या अपयशाचे मोठे कारण समोर आले; पाहा BCCIने कोणता मूर्खपणा केला

आवेश खान– आयपीएलमध्ये केएल भरतने मारलेला षटकार वगळता आवेश खानसाठी २०२१चा हंगाम जबरदस्त गेलाय. त्याने २४ विकेट मिळवल्या आहेत. बाऊसर सोबत अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याच्या मध्ये आहे.

युजवेंद्र चहल- कोणत्याही संघात युचवेंद्र चहल सारखा गोलंदाज असणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे. गेल्या ३-४ वर्षापासून ते संघातील मुख्य फिरकीपटू असून त्याला वर्ल्डकप संघात स्थान न देणे हे समजण्याच्या पलीकडचे होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: