पेटीएमच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…


हायलाइट्स:

  • पेटीएमची प्रवर्तक (प्रमोटर) वन ९७ कम्युनिकेशन्सचा १८,३०० कोटी रुपयांचा महा आयपीओ आज खुला झाला.
  • दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक फायदेशीर ठरेल की नाही, याबाबत विश्लेषकांमध्ये मतभिन्नता आहे.
  • काही विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेनसाठी हा आयपीओ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची प्रवर्तक (प्रमोटर) वन ९७ कम्युनिकेशन्सचा १८,३०० कोटी रुपयांचा महा आयपीओ (IPO) आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक फायदेशीर ठरेल की नाही, याबाबत विश्लेषकांमध्ये मतभिन्नता आहे. काही विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेनसाठी हा आयपीओ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

युरोपात महाराष्ट्र गौरव! हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी मिळाला पुरस्कार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंती उपस्थिती
या आयपीओ (IPO) मध्ये ८,३०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आहेत, तर प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक १०,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. कंपनीने आयपीओसाठी २०८०-२१५० रुपये प्राईस बँड ठेवली आहे. कंपनीने आयपीओच्या आधी गेल्या आठवड्यात १२२ अँकर गुंतवणूकदारांकडून ८२३५ कोटी रुपये उभारले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करावी की नाही, याबाबत विश्लेषक काय म्हणतात ते जाणून घेऊया.

अर्थसंवाद, जादूचा दिवा ; इंधनदर बदलानंतरची शेअर बाजारातील गुंतवणूक
कंपनीला २० अब्ज डॉलरचे मूल्यांकन अपेक्षित आहे, जे वित्त वर्ष २०२१ मध्ये कंपनीच्या विक्रीच्या ४९ पट आहे. कंपनीचे सध्याचे ऑपरेटिंग मेट्रिक्स पाहता, त्याचे मूल्यांकन महाग दिसते. दीर्घकालीन वाढीची क्षमता, वर्तमान आर्थिक मापदंड आणि रिच व्हॅल्युएशन्स लक्षात घेता, फक्त जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांनी यात उडी घेतली पाहिजे.
– येशा शाह, संशोधन प्रमुख, सॅमको इंडस्ट्रीज

नोटाबंदीची पाच वर्षे : डिजिटल पेमेंटमध्ये झाली वाढ, वाचा काय सांगतो विशेष अहवाल
त्याचे मूल्यांकन महाग वाटू शकते, पण पेटीएम हे आज मोबाईल डिजिटल पेमेंटचा एक पर्याय बनली आहे. तसेच कंपनी देशातील मोबाइल पेमेंट क्षेत्रातील बाजारपेठेत आघाडीवर आहे. पुढील ५ वर्षांत मोबाईल पेमेंट महसूल ५ पट वाढण्याची अपेक्षा आहे आणि याचा सर्वात मोठा फायदा पेटीएमला होईल. त्यामुळे त्याचे मूल्यांकन वाजवी आहे.
– ज्योती रॉय, इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट, एंजल वन

आम्ही या आयपीओला Avoid रेटिंग दिले आहे. कारण तोट्यात चाललेल्या कंपनीसाठी त्याचे मूल्यांकन खूप जास्त आहे. कंपनी तिच्या विक्रीच्या ४४.३६ पट मार्केट कॅपसह सूचीबद्ध होईल. देशात अशी कोणतीही सूचीबद्ध कंपनी नाही, जिच्या व्यवसायाची तुलना पेटीएमच्या व्यवसायाशी करता येईल.
– सौरभ जोशी, विश्लेषक, मारवाडी शेअर्स अँड फायनान्स

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जेव्हा कोरोना महामारीमुळे डिजिटल वॉलेट आणि मोबाइल पेमेंटला वेग आला, तेव्हा पेटीएमचा महसूल कमी झाला. मार्केटिंग आणि प्रमोशनल खर्चात ६० टक्के कपात करूनही कंपनीचा तोटा सुरूच राहिला. तसेच नफ्याकडे वळण्याचा कंपनीचा मार्ग स्पष्ट दिसत नाही. या आयपीओमध्ये ओएफएस (OFS) ची रक्कम फ्रेश इश्यूपेक्षा जास्त आहे. दीर्घकालीन शक्यता लक्षात घेता हा एक यशस्वी आयपीओ असू शकतो, पण यामध्ये गुंतवणूक करणे, हा फायदेशीर व्यवहार होताना दिसत नाही.
– रिचा अग्रवाल, वरिष्ठ संशोधन विश्लेषक, इक्विटीमास्टर

पेटीएम आयपीओवर एक नजर –
सब्सक्रिप्शन : नोव्हेंबर ८ ते १०
फेस व्हॅल्यू (दर्शनी मूल्य) : १ रुपये
प्राईस बँड : २०८०-२१५० रुपये
वाटप : १५ नोव्हेंबर
रिफंड (परतावा) : १६ नोव्हेंबर
शेअर क्रेडिट : १७ नोव्हेंबर
लिस्टिंग (सूची) : १८ नोव्हेंबरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: