जोडोनिया कर; प्राप्तिकर नोटिसा : माहितीही… दखलही


हायलाइट्स:

  • काही सूचना आपल्याला केवळ माहिती म्हणून दिल्या जातात,
  • तर काही मात्र आपण त्याची दखल घेऊन पुढे कार्यवाही करावी, असे सुचित करतात.
  • करदात्याने सर्वप्रथम सूचनापत्र नीट वाचून काय करणे अपेक्षित आहे हे ठरवावे.

सीए संजीव गोखले, मुंबई : सध्या चेहरा नसलेले (फेसलेस) प्राप्तिकर खाते आपल्याशी ईमेल, मेसेजद्वारे संपर्क करते. बरेचवेळा करदाता सूचनापत्र नीट वाचतही नाही व घाबरून जातो. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संगणकीकरणामुळे प्राप्तिकर खात्याची प्रणाली या नोटिसा पाठवत असते. आपले विवरणपत्र मिळाले, ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाले अशा संदेशांपासून ते विवरणपत्र तपासले व मूल्यांकन (असेसमेंट) झाले, आपला परतावा बँकेत पाठवला अशा अनेक सूचना या एकतर्फी संवादातून आपल्यापर्यंत पोहोचवत असते.

सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करताय; कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा मग निर्णय घ्या
यापैकी काही सूचना आपल्याला केवळ माहिती म्हणून दिल्या जातात, तर काही मात्र आपण त्याची दखल घेऊन पुढे कार्यवाही करावी, असे सुचित करतात. करदात्याने सर्वप्रथम सूचनापत्र नीट वाचून काय करणे अपेक्षित आहे हे ठरवावे. अगदी जरुर वाटल्यास कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा. सर्वसाधारणपणे खालील नोटिसा करदात्याला येत असतात –

बंपर कमाईची संधी; या आठवड्यात उघडणार ‘पेटीएम’सह दोन कंपन्यांचे आयपीओ
कलम १४३(१) – केवळ सूचना
विवरणपत्र सादर झाल्यानंतर प्रोसेसिंग सेंटरद्वारे प्रक्रिया करून जर योग्य असेल तर आपल्याकडून करदायित्व नाही किंवा परतावा निश्चित झाला आहे, अथवा कर व परतावा दोन्ही नाही अशी सूचना दिली जाते. ही नोटीस करदात्याने वाचून केवळ फाइल करावी. मात्र विवरणपत्रात त्रुटी असतील किंवा प्रथमदर्शनी चुकीची वजावट मागितली गेली असेल, तर अशा चुका सुधारून विवरणपत्र तपासून सूचना दिली जाते. त्याप्रमाणे आपल्याला करदायित्व आहे की परतावा हे निश्चित केले जाते.

करदात्याने अशा सुधारणा तपासून जर मान्य असतील तर काहीच करायचे नसते. मात्र मान्य नसतील, तर मात्र पुढे कार्यवाही अपेक्षित असते. कधी कापलेल्या कराचे क्रेडिट दिले नसते, किंवा इतर काही चुका आढळतात. अशा वेळी कलम १५४ अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकनातील चूक सुधारावी अशी विनंती करावी.

सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करताय; कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा मग निर्णय घ्या
कलम १४३(२) अंतर्गत नोटीस –
ही नोटीस मात्र आपले विवरणपत्र छाननी व तपासणी करण्याकरता निवडले आहे हे सूचित करण्यासाठी दिली जाते. ही नोटीस मिळाल्यावर करदात्याने प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन ई-प्रोसिडिंग या मेनूत जाऊन संबंधित नोटीस व कोणत्या माहितीची विचारणा झाली आहे ते पाहणे आवश्यक आहे. या नोटिशीला आता केवळ ऑनलाइन पद्धतीने उत्तर देणे जरुरीचे आहे. प्रत्यक्ष प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या कचेरीत जाणे जरुरीचे नाही. इतकेच नव्हे; तर प्राप्तिकर आधिकारी कोण हे समजत देखील नाही. त्यामुळे घरबसल्या मनात कोणतीही भीती न बाळगता विवरणपत्र मूल्यांकन व तपासणीची प्रक्रिया पूर्ण करता येते. यात आपल्याला उत्तर देण्यासाठी दिलेल्या अवधीत आपण उत्तरे व संबंधित पुरावे ऑनलाइन पद्धतीने सादर करणे अपेक्षित आहे. काही कारणांमुळे आपल्याला वेळ वाढवून हवा असेल तर तशी विनंती योग्य मेनूवर जाऊन आपण करू शकतो. परंतु या नोटिशीकडे व तपास प्रक्रियेकडे दुर्लक्ष मात्र करू नका.

ही प्रकिया पूर्ण झाल्यावर कलम १४३(३) अंतर्गत मूल्यांकन ऑर्डर दिली जाते. यात अधिकारी आपण दिलेल्या माहितीच्या आधारावर आपले करपात्र उत्पन्न ठरवत असतो. त्याप्रमाणे करदायित्व असेल तर तशी वेगळी नोटीस देत असतो. करदात्याला ही ऑडर मान्य असेल तर करभरणा करावा. अन्यथा यावर अपील करण्याचा अधिकार करदात्याला दिलेला आहे.
(पूर्वार्ध)Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: