हायलाइट्स:
- नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर आरोप
- वानखेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात?
- क्रांती रेडकरनं दिलं उत्तर
नवाब मलिक यांनी आज सकाळीच एक ट्वीट करत समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. पुण्यातील कोर्टात हर्षदा रेडकर नावावर केस प्रलंबित आहेत. त्यांचा समीर वानखेडेंशी काय संबंध याचा त्यांनी खुलासा करावा, असं आव्हान नवाब मलिक यांनी केलं आहे. तसंच, नवाब मलिक यांनी ई- कोर्ट सर्व्हिसवरील फोटो शेअर केले आहेत. नवाब मलिकांच्या या आरोपांनंतर आता क्रांती रेडकरनं भाष्य केलं आहे.
वाचाः काशिफ खानने मला पार्टीचे निमंत्रण दिले होते पण…; अस्लम शेख यांचा खुलासा
नवाब मलिक यांनी जे ट्वीट केलंय, त्यावरुन प्रसारमाध्यमांना अनेक प्रश्न पडलेत हे मला माहिती आहे. या प्रकरणात माझ्या बहिणीला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या सल्ल्यानुसार, हे प्रकपण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं त्यावर लगेच मत देणं योग्य होणार नाही. माझी बहिण कायदेशिररित्या नवाब मलिक यांच्या ट्विटला उत्तर देईल, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणाशी समीर वानखेडे यांचा काहीही संबंध नाही, असंही क्रांतीने म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनीही फेटाळले आरोप
क्रांती रेडकरच्या बहिणीवर २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल मी सप्टेंबर २००८ मध्ये आयआरएस झालोय. २०१७ मध्ये माझे क्रांतीसोबत लग्न झाले. मग २००८च्या प्रकरणाशी माझा काय संबंध, असा उलट सवाल समीर वानखेडेंनी केला आहे.
वाचाः समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात?; नवाब मलिकांचा गंभीर आरोप