अफगाणिस्तानच्या पराभवानंतर भारताने घेतला मोठा निर्णय; संघ व्यवस्थापनाने रद्द केला…


नवी दिल्ली: रविवारी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामना शेवटाकडे जाऊ लागला भारतीय चाहते निराश झाले. अफगाणिस्तानच्या पराभवाने भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. सामन्याच्या निकालानंतर भारतीय संघाने परत येण्याची तयारी केली.

वाचा- विराट कोहलीच्या त्या एका चुकीने भारताचा घात झाला; अन्य संघ जिंकत होते आणि…

भारत टी-२० वर्ल्डकपमधील आज सोमवारी अखेरची लढत खेळणार आहे. हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. अफगाणिस्तानच्या पराभवानंतर भारताने आजच्या सामन्यासाठीचा सराव रद्द केला. भारतीय संघ दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर अखेरची मॅच खेळणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी न मिळाल्यानंतर निराश झालेले भारतीय खेळाडू या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

वाचा- भारतीय संघाच्या अपयशाचे मोठे कारण समोर आले; पाहा BCCIने कोणता मूर्खपणा केला

निरोप…

टी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा अखेरचा सामना असेल त्याच बरोबर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा देखील कालावधी या सामन्यानंतर संपणार आहे. त्यामुळे भारतीय संघ त्यांना मोठा विजय मिळवून निरोप देण्यास उत्सुक असेल. शास्त्रींसोबत अन्य सपोर्ट स्टाफ यांचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या सर्वांचा गोड निरोप करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

वाचा- कपिल देव संतापले; खेळाडूंना IPL आवडते, देशाकडून खेळण्यास महत्त्व नाही

भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ वर्ल्डकपमधील अखेरची लढत खेळणार आहे. दोन्ही संघांना खेळाडूंची चाचणी करण्याची संधी आहे. भारतीय संघ वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे या लढतीत खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जाईल. हार्दिक पंड्याने गेल्या दोन सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. त्या शिवाय सूर्यकुमार यादव आणि शार्दूर ठाकूर यांच्या कामगिरीवर नजर असेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वरुण चक्रवर्तीकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण होऊ शकली नाही. या सामन्यात भारत काही सिनिअर खेळाडूंना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संधी देऊ शकतो.

सावध रहावे लागले…

नामिबियाचा संघ कमकूवत असला तरी स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असले. नामिबियाकडे गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे तो विराट आणि कंपनीला धक्का देऊ शकतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: