नोटाबंदीची पाच वर्षे : डिजिटल पेमेंटमध्ये झाली वाढ, वाचा काय सांगतो विशेष अहवाल


नवी दिल्ली : ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या नोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. पाच वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, चलनात असलेल्या नोटांची संख्याही वेगाने वाढत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशातील कोरोना विषाणूची साथ लक्षात घेता लोकांनी सावधगिरी म्हणून रोख रक्कम ठेवण्यावर जास्त भर दिला. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात चलनात असलेल्या नोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

बंपर कमाईची संधी; या आठवड्यात उघडणार ‘पेटीएम’सह दोन कंपन्यांचे आयपीओ
अधिकृत आकडेवारीनुसार, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारख्या माध्यमांद्वारे डिजिटल पेमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चे यूपीआय (UPI) हे देशातील पेमेंटचे प्रमुख माध्यम म्हणून वेगाने उदयास येत आहे. असे असूनही चलनात येणाऱ्या नोटांची वाढ मंदावली असली तरी अजूनही सुरूच आहे.

तूर्त दिलासा ; पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरांबाबत घेतला हा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती घोषणा
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून त्या वेळी चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि काळ्या पैशाला आळा घालणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश होता.

रोखीचा कल झपाट्याने वाढला
आरबीआय (RBI)च्या मते, ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य २६.८८ लाख कोटी रुपये होते. २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत त्यात २,२८,९६३ कोटी रुपयांची वाढ झाली. त्याच वार्षिक आधारावर, ३० ऑक्टोबर २०२० रोजी त्यात ४,५७,०५९ कोटी रुपयांची आणि एका वर्षापूर्वी १ नोव्हेंबर २०१९ रोजी २,८४,४५१ कोटी रुपयांची वाढ झाली होती.

सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करताय; कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा मग निर्णय घ्या
चलनात असलेल्या नोटांचे मूल्य आणि प्रमाण २०२०-२१ मध्ये अनुक्रमे १६.८ टक्के आणि ७.२ टक्क्यांनी वाढले आहे, तर २०१९-२० मध्ये त्यात अनुक्रमे १४.७ टक्के आणि ६.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात चलनात असलेल्या नोटांच्या संख्येत वाढ होण्यामागे कोरोना महामारीचे कारण सांगण्यात येत आहे. महामारीच्या काळात लोकांनी सावधगिरी म्हणून रोख रक्कम ठेवली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: