तूर्त दिलासा ; पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरांबाबत घेतला हा निर्णय


हायलाइट्स:

  • केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती.
  • जवळपास २३ राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी इंधनावरील व्हॅट कमी केला आहे.
  • पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त झाले आहे.

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधन दर स्थिर ठेवले. सलग चौथ्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही.

सणासुदीत कर्ज घेण्याचा विचार करताय; कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा मग निर्णय घ्या
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये इंधन दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांची कपात केली होती. त्यांनतर जवळपास २३ राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे तेथे पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त झाले आहे.

दोन दिवसात सोनं ९५० रुपयांनी महागलं ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
दरम्यान, आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे.दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे.

पॅनकार्डशिवाय खाती उघडली; प्राप्तिकर विभागाने ‘या’ सहकारी बँंकेचे ५३ कोटी गोठवले
जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ९० सेंट्सने वधारला आणि प्रती बॅरल ८३.६४ डॉलर इतका वाढला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.१ टक्क्यांनी वधारला आणि तो ८२.१४ डॉलर झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: