निवृत्तीच्या निर्णयानंतर ब्राव्होने चाहत्यांना दिली खुशखबर; धोनीलाही मिळणार मोठा दिलासा


दुबई : टी-२० क्रिकेट प्रकारातील सर्वात लोकप्रिय अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहते दु:खी झाले आहेत, पण ब्राव्होने नुकत्याच केलेल्या एका विधानाने चाहत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जर शरीराने साथ दिली, तर आणखी काही वर्षे फ्रँचायझी क्रिकेट खेळायचे आहे, असे ब्राव्होने शनिवारी (६ नोव्हेंबर) सांगितले. ब्राव्होने निवृत्ती जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याने यापूर्वी निवृत्ती घेतली होती, पण गतविजेत्या वेस्ट इंडिजला पुन्हा जेतेपद मिळवून देण्यासाठी २०१९ मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला.

वाचा- ICCच्या स्पर्धेत २०१२ नंतर प्रथमच असे घडतय; भारतीय संघाशिवाय होणार ही घटना

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजचे आव्हान सुपर-१२ टप्प्यातच संपुष्टात आले. पाच सामन्यांत त्यांना फक्त एक विजय मिळवत समाधान मानावे लागत आहे. ब्राव्होशिवाय अनुभवी फलंदाज ख्रिस गेलच्याही निवृत्तीची चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाद झाल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने अभिवादन केले त्यावरून गेलच्या निवृत्तीचाही अंदाज लावला जात आहे. ब्राव्हो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याच्या त्याच्या निर्णयामुळे महेंद्रसिंह धोनीलाही काहीसा दिलासा मिळाला आहे, कारण ब्राव्हो हा सीएसकेचा महत्त्वाचा भाग आहे.

वाचा- भारताला मोठा धक्का; मॅच खेळण्याआधीच टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर

फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार
ऑस्ट्रेलियाकडून आठ गडी राखून सामना गमावल्यानंतर ब्राव्हो पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘जोपर्यंत माझे शरीर मला साथ देईल, तोपर्यंत मी आणखी काही वर्षे फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन. काही वर्षांपूर्वी मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, पण वेस्ट इंडिज क्रिकेटचे अध्यक्ष आणि नेतृत्व बदलल्यानंतर मी माझा विचार बदलला. मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होतो आणि मला वेस्ट इंडिजला काहीतरी परत द्यायचे होते. मी क्रिकेटचा आनंद घेत होतो.

वाचा- NZ vs AFG न्यूझीलंडने बाजी मारली, अफगाणिस्तानचा पराभव; भारताचा सेमीफायनलचा पत्ता कट

कारकीर्दीतील तो खास क्षण
ब्राव्होला जेव्हा त्याच्या कारकीर्दीतील खास क्षणाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, “लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणे, हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात खास क्षण आहे. माझा बालपणीचा नायक ब्रायन लारा हा कर्णधार होता. २००४ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हा माझ्यासाठी आणखी एक खास क्षण होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची माझी पहिली कसोटी आणि दोन टी-२० विश्वचषक जिंकणे माझ्यासाठी खूप खास आहेत. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी थोडेफार यश मिळवू शकलो, हे आश्चर्यकारक आहे.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: