संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गांचे भूमिपूजन होणार केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
पंढरपूर ,दि.07/11/2021 - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्या सोमवार ०८/११/२०२१ रोजी विविध महाराज मंडळी यांच्या उपस्थितीत होणार असून भूमीपूजन कार्यक्रम केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari हस्ते केले जाणार असून यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे uddhav thakare, उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis उपस्थित राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे जनतेशी संवाद साधणार आहेत माहिती आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर येथे दिली .
आषाढी वारीसाठी आळंदी देहूमधून लाखो भाविक पंढरपूर येथे चालत येत असतात . हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रध्देचा विषय आहे .लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात तो रस्ता भव्य व सुंदर असावा,भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारी करण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचे भूमिपूजन करण्यात आले नव्हते .
त्यामुळे उद्या सोमवार ०८/११/२०२१ रोजी सकाळी अकरा वाजता रेल्वे मैदानावर सदर कार्यक्रम पार पडणार आहे.हा पालखी महामार्ग वारकर्यांसाठी करण्यात आला असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज दिंडीमधील प्रमुख महाराज मंडळी यांच्या हस्ते नारळ वाढवला जाणार असल्याचे आमदार परिचारक यांनी सांगितले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजीत पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालखी मार्गावरील गावाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार ,आमदार यांचीही उपस्थित राहणार आहे .
गडकरी सोमवारी दुपारी १२ वाजता पंढरपुरात दाखल होतील. प्रथम ते विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेतील. पंतनगर येथे गडकरींच्या उपस्थितीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता रेल्वे मैदानावर भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे जनतेशी संवाद साधतील. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमाराला गडकरी नागपूरकडे रवाना होतील.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी ६ हजार ६९३ कोटी तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी ३ हजार ७९८ कोटी असा जवळपास दहा हजार कोटी रूपयांचा निधी या दोन्ही रस्त्यां साठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून मंजूर करण्यात आला आहे यापैकी पालखी मार्गाचे काम सुरू झाले असून वाखरी ते मोहोळ ९९ टक्के , वाखरी ते खुडूस ९६ टक्के खुडूस ते धर्मपुरी ९६ टक्के , धर्मपुरी ते लोणंद १८ टक्के , लोणंद ते जेजुरी ६८ टक्के तर जेजुरी ते हडपसर ५१ टक्के जमीन अधिग्रहण करण्याचे काम झाले आहे. तुकोबाराय मार्गाचे देखील जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे.