आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये सध्या सुरू असलेल्या म्हणजेच २०२१च्या टी-२० वर्ल्डकपचे विजेते आणि उपविजेते थेट पात्र होतील. या शिवाय सहा नोव्हेंबर २०२१ पर्यंत क्रमवारीतील अव्वल सहा संघ देखील स्पर्धेसाठी पात्र ठरतील. यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. तर श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि नामिबिया यांना सुपर १२ मध्ये पोहोचण्यासाठी पात्रता फेरीतील सामने खेळावे लागतील.
वाचा- भारताला मोठा धक्का; मॅच खेळण्याआधीच टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर
आयसीसी टी-२० क्रमवारीत सध्या इंग्लंड २८० गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर पाकिस्तान २६५ गुणांसह दुसऱ्या, भारत २६३ सह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि दहाव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आहे. क्रमवारीत बांगलादेश आणि श्रीलंका यांचे प्रत्येकी २३२ गुण आहेत. पण बांगलादेश पॉइंट्स अधिक असल्याने त्यांची सुपर १२ साठी थेट निवड झाली आहे.
वाचा- न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान लढतीत १७ कंपन्यांचा जीव अडकला; मॅचच्या निकालावर..