मोठी घडामोड! SIT अॅक्शन मोडमध्ये; आर्यन खानला समन्स


हायलाइट्स:

  • जामीन मिळाल्यानंतरही आर्यन खानला उसंत नाही
  • एनसीबीच्या एसआयटीचं आर्यनला समन्स
  • चौकशीसाठी उद्या हजर राहण्याची शक्यता

मुंबई:आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह (Aryan Khan Drugs Case) अन्य सहा प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्यानंतर या प्रकरणांचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरानं (NCB) विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. ही एसआयटी टीम तातडीनं कामाला लागली आहे. त्यांनी सर्व प्रकरणातील संबंधितांची नव्यानं चौकशी सुरू केली असून आर्यन खानसह अनेकांना समन्स बजावलं आहे.

आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरण बोगस असल्याचे आरोप झाल्यानंतर, त्याबाबतचे अनेक पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समोर आणल्यानंतर व खुद्द या प्रकरणातील साक्षीदारांनी समोर येऊन खंडणीचे आरोप केल्यानंतर एनसीबी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचाच यामागे हात असल्याचा आरोप झाल्यामुळं एनसीबीनं त्यांच्याकडून ही प्रकरणं काढून घेतली आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीनं हा तपास हाती घेतला आहे. यात आर्यन खान, समीर खान प्रकरणांसह अन्य चार प्रकरणं आहेत.

वाचा: ‘शाहरुख खानला आजही धमकावलं जातंय; त्याला सांगितलं जातंय की…’

तपास हाती येताच एनसीबीच्या एसआयटी पथकानं संबंधित आरोपींना समन्स बजावणं सुरू केलं आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट व अचित कुमार याला आज एनसीबीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार ते आज चौकशीला सामोरे गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीनं आर्यन खान यालाही आज बोलावलं होतं. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यानं वेळ मागून घेतली आहे. तो सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता त्याच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे.

वाचा: नवाब मलिक यांची भाजपला हात जोडून विनंती; म्हणाले…

आर्यन खान, अरबाझ मर्चंट व मुनमून धामेचासह इतर सर्व आरोपी सध्या जामिनावर आहेत. याआधी शुक्रवारी त्यांनी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे. समीर खान हे देखील सध्या जामिनावर आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: