hafiz saeed : पाकचा बनाव उघड; दहशतवादी हाफिज सईदसह ६ जणांची निर्दोष मुक्तता


लाहोरः मुंबईवर २००८ ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड ( mumbai attack mastermind hafiz saeed ) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा (LeT) मुख्य सूत्रधार हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा (JUD) च्या सहा नेत्यांना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांना दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट लष्कर-ए-तोयबाने रचला होता. या हल्ल्यात १६० हून अधिक जण मारले गेले होते. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. सईद याच्या जमात-उद-दावा (JuD) या संघटनेचे कनेक्शन लष्कर-ए-तोयबाशी आहे.

ट्रायल कोर्टाने ६ नेत्यांना ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या नेत्यांमध्ये प्रोफेसर मलिक जफर इक्बाल, याह्या मुजाहिद, नसरुल्लाह, समिउल्लाह आणि उमर बहादूर यांना नऊ वर्षांची, तर हाफिज अब्दुल रहमान मक्की यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, पंजाब पोलिसांच्या काउंटर टेररिझम विभागाने एफआयआर दाखल केल्यानंतर रेहमान मक्कीविरोधात ही कारवाई केली होती.

इराक हादरले! पंतप्रधान कादिमींवर ड्रोनद्वारे हल्ला, हत्येच्या प्रयत्नातून बचावले

अपीलकर्त्यांनी मुख्य न्यायाधीश मुहम्मद अमीर भाटी आणि न्यायाधीश तारिक सलीम शेख यांच्या खंडपीठासमोर आपल्या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान दिले. फिर्यादी अपीलकर्त्यांवरील आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले आहेत, असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: