‘ही तर तालिबानची इच्छा’; ICCला सांगितले या गोष्टीत बदल करा


नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ भाग्यवान ठरला आहे. यानंतर ११ सदस्यीय खेळाडूंचा संघ हाय-प्रोफाइल स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अद्याप अफगाणिस्तान संघाचे सदस्यत्व निलंबित करायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेतलेला नाही, असे टीआरटी वर्ल्डच्या अहवालात म्हटले आहे.

वाचा- न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान लढतीत १७ कंपन्यांचा जीव अडकला; मॅचच्या निकालावर

आयसीसी (ICC)ने अद्याप तालिबानला अफगाणिस्तानातील कायदेशीर सत्ताधारी म्हणून मान्यता दिलेली नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने टीआरटी वर्ल्डला सांगितले की, १५ ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यापूर्वी आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेचा मसुदा तयार केला होता, त्यामुळे शेवटच्या क्षणी आयसीसी संघाला अपात्र ठरवू शकत नाही.

वाचा- आज अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडचा पराभव झाला…; शोएब अख्तर म्हणायचे तरी काय

देशातील क्रिकेटच्या भवितव्यासाठी आयसीसीने आपल्या मतांनुसार नियम बदलावेत, अशी तालिबानची इच्छा आहे. देशाच्या राष्ट्रगीतात आणि राष्ट्रध्वजामध्ये बदल करण्याची विनंती देखील तालिबानने केली होती. तसेच खेळाडूंनी संगीताशिवाय राष्ट्रगीत गावे, अशी त्यांची इच्छा आहे, अशी माहिती क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे.

वाचा- अफगाणिस्तानने दिली भारताला आनंदाची बातमी, न्यूझीलंडविरुद्ध जिंकला…

अहवालात पुढे म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी अखेर आपले मतभेद मिटवले असून, अफगाण संघाला विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली. अफगाण संघाला शेवटच्या क्षणी अपात्र ठरवणे, हा आयसीसीसाठी सोपा पर्याय नव्हता. त्यांना आपले राजकारण बाजूला ठेवावे लागले. त्यांना माहित होते की, राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब जादरान सारख्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या अफगाण क्रिकेटपटूंना पाहणारे हजारो टीव्ही प्रेक्षक आणि मैदानात येऊन सामना पाहणारे शेकडो दर्शक ते एका झटक्यात गमावतील, असेही बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: