हायलाइट्स:
- राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप
- विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर
- हिंगोली जिल्ह्यात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी आंदोलन पुकारले आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हिंगोली जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान रमेश टाळकुटे यांनी आत्महत्येचा उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर लगेचच रमेशला हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
वाचाः अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ; १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी कायम
रमेश यांनी विष प्राशन केल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. तसंच. मला माफ करा, तुमचा दिवाळी सण आनंदात साजरा करु शकलो नाही. त्यामुळं मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे, असं सांगत फोन बंद केला. रमेश यांनी विष प्राशन केल्याचं कुटुंबीयांनी कळतच त्यांनी तातडीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत रमेश यांना इतर सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठांनी रमेश यांच्या तब्येतीची साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
वाचाः ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरसोबत काय कनेक्शन?’