इराक हादरले! पंतप्रधान कादिमींवर ड्रोनद्वारे हल्ला, हत्येच्या प्रयत्नातून बचावले


बगदादः इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर ( mustafa al kadhimi survives assassination ) रविवारी पहाटे सशस्त्र ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पंतप्रधानांना कोणतीही इजा झाली नाही. ते सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या महिन्यात झालेल्या संसदीय निवडणुकीचे निकाल इराण-समर्थित बंडखोरांनी नाकारल्यातून निर्माण झालेल्या या तणावात या हल्ल्यामुळे भर पडली.

बगदादच्या अत्यंत सुरक्षित ‘ग्रीन झोन’ भागात झालेल्या हल्ल्यात पंतप्रधानांचे सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत, असं दोन इराकी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान अल-कादिमी यांनी ट्विट केलं आहे, देशद्रोह्यांचे रॉकेट वीर सुरक्षा दलांचे मनोबल आणि मनोधैर्याला धक्का देऊ शकत नाही. मी बरा आहे आणि आपल्या लोकांमध्ये आहे. देवाचे आभार आहे, असं ट्विटमध्ये अल कादिमी यांनी म्हटलं आहे.

अल-काधिमी यांच्या निवासस्थानावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल-काधिमी यांना कोणतीही इजा झाली नाही आणि ते ठीक आहेत, असे सरकारन म्हटले आहे. बगदादच्या रहिवाशांनी परदेशी दूतावास आणि सरकारी कार्यालये असलेल्या ‘ग्रीन झोन’ मधून स्फोट आणि बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला. हत्येच्या प्रयत्नाचा हा एक भाग होता पंतप्रधानांच्या निवासस्थानाला स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने लक्ष्य केले होते. आता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत, असं सरकारडून एका निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

काबूल हल्ला : तालिबान कमांडर हमदुल्लाह मुखलिससह २५ जणांचा मृत्यू

या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. सुरक्षा दल आणि इराण समर्थक शिया बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान ही घटना घडली. इराकच्या संसदीय निवडणुकांचे निकाल शिया बंडखोरांनी नाकारले आहेत आणि जवळपास महिनाभरापासून ‘ग्रीन झोन’च्या बाहेर तळ ठोकून आहेत.

ब्रिटनला अतिआत्मविश्वासाचा फटका! करोना चाचणीत ३७ अब्ज पौंडचा चुरडा केल्याचा ठपकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: