वाचा- आज अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडचा पराभव झाला…; शोएब अख्तर म्हणायचे तरी काय
स्टारने जाहिरातीच्या ७० टक्के स्लॉट स्पर्धा सुरू होण्याच्या आधी विकल्या होत्या. या स्पर्धेतून स्टारला एक हजार कोटीपर्यंत कमाई करण्याची आशा आहे. यासाठी १६ कंपन्यांसोबत करार झालाय. प्रत्येक सामन्यात ४५ मिनिटाचा स्लॉट तयार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्याती लढतीत स्टारने १० सेकंदाचा स्लॉट २५ लाख रुपयांना विकला होता. २०१६च्या वर्ल्सकपमध्ये स्टारने जाहिरातीतून २६० कोटी रुपये कमावले होते. तेव्हा भारत सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता आणि स्टारचे नुकसान झाले होते.
या कंपन्यांचे जीव अडकला….
ज्या मोठ्या कंपन्यांनी जाहिरातीसाठी पैसे दिले आहेत. त्यामध्ये स्टार, कोका-कोला, ओप्पो, एमआरएफ, बायजू, बीरा ९१, मनी ग्राम, भारत पे, एमिरेट्स, अपस्टॉक्स, निसान, जॅकब्स क्रीक, ड्रीम ११, बुकिंग डॉट कॉम, रॉयल स्टॅग, विमाल इलायची आणि स्कोडा यांचा समावेश होतो. २०१६ साली जेव्हा टीम इंडिया स्पर्धेत होती तेव्हा पुरुष दर्शकांची संख्या ४.४ इतकी होती. यावेळी ती ३ टक्क्यांनी घसरू शकते. भारतीय संघाच्या पराभवाचा धक्का थेट रेटिंगवर पडतो. करोनाच्या झटक्यानंतर सण आणि टी-२० वर्ल्डकप स्पर्धा कंपन्यांसाठी बूस्टर डोस होता. जर भारतीय संघाचा पराभव झाला तर नुकसान होईल.