हायलाइट्स:
- अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आग
- पीएम केअरमधील व्हेंटिलेटरकरकडे बोट
- जयंत पाटलांनी व्यक्त केले मत
जलसंपदा मंत्री पाटील यांनी काल रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना स्थळी पाहणी केली. आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष माणिकराव विधाते यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी आमदार जगताप व त्यांच्या स्वीय सहायक यांनी दुर्घटनेवेळी केलेल्या मदत कार्याचे सुरुवातीला कौतुक केले. ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे, असे सांगून घटना तर झाली आहे, यातील दोषींवर कारवाईसाठी चौकशी समितीचा अहवाल लवकरात लवकर तयार व्हावा यासाठी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
वाचाः अहमदनगर रुग्णालय आग: व्हेंटिलेटरच्या मुद्द्याला पालकमंत्री मुश्रीफ यांचे समर्थन
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी अतिदक्षता विभागात ही आग पीएम केअर फंडातुन मिळालेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन लागली आहे, असा संशय व्यक्त केला आहे. याकडे मंत्री पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सुरुवातीला आमदार पवार यांच्या या विधानाबाबत आपणास काही माहित नाही, असे सांगितले. पाटील पुढे म्हणाले पवारांचे ते विधान त्यांचे आहे. त्यांनी या घटनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन मत व्यक्त केले पाहिजे. या घटनेसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीचा अहवाल लवकरात लवकर येण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाचाः ‘पीएम केअर’मधील व्हेंटिलेटरमुळे आग भडकली?; रोहित पवारांना संशय