Semis : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत दाखल, दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली अपयशी…

शारजा : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आजचा सामना सर्वांसाठी महत्वाचा होता. कारण आजच्या सामन्यातून नेमके कोणते संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार, हे ठरणार होते. दक्षिण आफ्रिकेने जर आजच्या सामन्यात इंग्लंडला १३१ धावांमध्ये रोखले असते तर त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता आले असते आणि ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीमधून बाद झाला असता. पण आजच्या सामन्याच दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडला १३१ धावांमध्ये रोखता आले नाही आणि त्यांचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग पावले. त्यामुळे आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.