nawab malik: ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक उद्या करणार नवा धमाका; म्हणाले, ‘सत्य सर्वांसमोर आणणार’


हायलाइट्स:

  • मोहित कंबोज यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत- नवाब मलिक.
  • मी उद्या सत्य सर्वांसमोर आणीन- नवाब मलिक.
  • आर्यन खानचे अपहरण करुन त्याला बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबण्यात आलंय- मलिक.

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (aryan khan drug case) अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (nawab malik) उद्या पुन्हा एक नवा धमाका करणार आहेत. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. सुनील पाटील (sunil patil) हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख (hrishikesh deshmukh) यांचा अत्यंत जवळचा असून त्याचे अनेक मंत्र्यांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे पदाधिकारी मोहित कबोज यांनी केले आहेत. यावर नवाब मलिक यांनी ट्विट करुत आपली बाजू मांडली आहे. मोहित कंबोज समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या आर्मीचा सदस्य असून त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन खोटे आरोप केल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. त्यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असून मी उद्या सत्य सर्वांसमोर आणेन, असेही मलिक यांनी म्हटले आहे. (I will reveal the truth tomorrow in drug case says minister nawab malik)

क्लिक करा आणि वाचा- ‘आर्यन खानला १०० टक्के अडकवले गेले आहे’; साक्षीदार विजय पगारेंचा खळबळजनक दावा

‘समीर वानखेडेंची चौकशी झाली पाहिजे’

आर्यन खानचे अपहरण करुन त्याला बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबण्यात आल्याचा मोठा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणी समीर दाऊद वानखेडे यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मलिकांनी केली. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी या विशेष तपास पथकात केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्हीकडील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानच्या सुटकेसाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले भाजप मंत्र्यासोबत; उडाली खळबळ

भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केल्यानंतर मलिक यांनी हे ट्विट केले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील हा असून तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे. तसेच पाटील हा अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांच्या अत्यंत जवळचा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पाटील याचे महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांशी संबंध असल्याचा दावाही कंबोज यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता; तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: