aryan khan drug case:’आर्यन खानला १०० टक्के अडकवले गेले आहे’; साक्षीदार विजय पगारेंचा खळबळजनक दावा


हायलाइट्स:

  • आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात १०० टक्के अडकवण्यात आले आहे- साक्षीदार विजय पगारे यांचा दावा.
  • हे संपूर्ण प्रकरण घडवण्यात आले- विजय पगारे यांचा गौप्यस्फोट.
  • सुनील पाटील, मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचा या प्रकरणाशी संबंध- विजय पगारे.

धुळे: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan drug case) दिवसेंदिवस नवी माहिती समोर येत असून या प्रकरणाला त्यामुळे धक्कादायक वळण मिळत आहे. या प्रकरणातील एक साक्षीदार विजय पगारे (Vijay Pagare) यांनी मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवण्यात आले असून हे संपूर्ण प्रकरण घडवण्यात आले असा दावा पगारे यांनी केला आहे. इतकेच नाही, तर या प्रकरणात मोठी डील करण्यात आली होती, मात्र पुढे ही डील फसली अशी खळबळजनक माहिती पगारे यांनी दिली आहे. (witness vijay pagare has made a sensational claim that aryan khan drug case was formed and aryan was implicated in it)

साक्षीदार विजय पगारे यांनी एनसीबीने कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकण्यापूर्वी दोन दोन दिवस आधी काय काय घडले होते यांची सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती देताना अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला १०० टक्के अडकवण्यात आल्याचे छातीठोकपणे पगारे यांनी सांगितले आहे. सुनील पाटील, मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा विजय पगारे यांनीही केला आहे. विविध वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत पगारे यांनी हा दावा केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानच्या सुटकेसाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले भाजप मंत्र्यासोबत; उडाली खळबळ

सुनील पाटीलचे समीर वानखेडेंशी सतत बोलणे होत होते- पगारे

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ही संपूर्ण कारवाईच ठरवून केलेली कारवाई आहे. किरण गोसावी याने या प्रकरणात ५० लाख रुपये घेतले होते. या प्रकरणाच्या संपूर्ण डीलमधील काही रक्कम अधिकाऱ्यांना जाणार होती. सुनील पाटील हे मला स्वतः बोललेला आहे. सुनील पाटील याचे एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याशी सतत बोलणं होत होते. माझ्यासमोरच हे बोलणे झालं आहे, असा खळबळजनक दावा पगारे यांनी केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी मनीष भानुशाली आणि सुनील पाटील यांची योग्य प्रकारे तपासणी केल्यास मी सांगत आहे ते संपूर्ण प्रकरण बाहेर येईल, असेही पगारे पुढे म्हणाले.

क्रूझवरी छाप्याच्या आधी नेमकं काय शिजलं याचा पर्दाफाश करताना पगारे म्हणाले की, सुनील पाटील यांच्यासोबत मी गेल्या पाच सहा महिन्यांपासून काम करत आहे. ते माझ्यासाठी एक काम काढून देणार होते. त्यांना मी पैसेही दिलेले होते. मी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पैसे मागत होतो. मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ हॉटेललाही थांबलो. केवळ ललितच नाही, तर आणखीही काही हॉटेलमध्ये मी त्यांच्यासोबत राहिलोलो आहे.

क्लिक करा आणि वाचा- सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता; तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

भाऊ, बडा गेम हो गया- मनीष भानुशाली

२७ सप्टेंबर या दिवशी वाशीमधील फॉर्च्युन हॉटेलमध्ये दोन रुम बुक करण्यात आलेले होते. त्या दिवशी फॉर्च्युन हॉटेलमध्ये संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मनीष भानुशाली आणि एक जाडी मुलगी आली. मी, किरण गोसावी आणि सुनील पाटील असे आम्ही तिघेजण दुसऱ्या रुममध्ये होतो. मनीष भानुशाली त्याच्या रुममध्ये दोन तास थांबला. मात्र तो निघत असताना आमच्या रुममध्ये आला. यावेळी त्याने सुनीलभाऊंची पप्पी देखील घेतली. तो म्हणाला, ‘भाऊ, बडा गेम हो गया. आपने को अभी के अभी अहमदाबाद निकलना है. नाना (विजय पगारे) को नही लेना है. मी हे ऐकल्यानंतर म्हणालो की, तुमचे काय असेल ते असेल. पण माझे पूर्ण पैसे मला मिळायला हवेत. मात्र, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, चिंता करू नका असं सुनील पाटील म्हणाला. आम्ही येईपर्यंत रुम सोडायचा नाही, असेही त्याने आम्हाला बजावले होते, असे पगारे यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे; मात्र, वानखेडेही असतील टीमचा भाग

२७ सप्टेंबरला रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमाराला एमएच- १२, ३००० या इनोव्हा गाडीत गोसावी, भानुशाली आणि सुनील पाटील बसले. गाडीवर पोलीस प्लेट आणि पोलीस कॅप होती. ते अहमदाबादला जायला निघाले. दुसऱ्या दिवशी २८ तारखेला मी संध्याकाळी सुनील पाटील यांना फोन केला. मात्र त्यावेळी ते अहमदाबादला पोहोचले नसल्याचे त्यांनी मला सांगितले. कारण मध्ये गाडीचे काही काम निघाल्याने त्यांना उशीर झाला होता. त्यानंतर मी २९ सप्टेंबरला त्यांना पुन्हा फोन केला. तेव्हा तू आराम कर, तुझे पैसे तुला मिळतील, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर सुनील पाटील यांनी मला फोन केले. मात्र प्रत्येक वेळी ते मला तुझे पैसे मिळतील असेच सांगत होते, असे पगारे म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: