Video : आजपासून राज ठाकरे राहणार नव्या घरात, पहा कसं आहे नवं ‘शिवतीर्थ’


मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचा उत्साह जोरदार सुरू आहे. आज भाऊबीज आहे. याच मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या घरामध्ये गृहप्रवेश केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवीन घरात नामफलकाचं पूजन करण्यात आलं. ‘शिवतीर्थ’ असं या नव्या घराला नाव देण्यात आलं आहे. राज ठाकरे हे आजपासून या नव्या घरामध्ये राहणार आहेत.

दादर येथील कृष्णकुंज शेजारीच ही नवीन पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे आजपासून त्यांच्या कुटुंबासह राहणार आहेत. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजची एक वेगळीच ओळख होती. दादर कृष्णकुंज म्हटलं की राज ठाकरे यांचं घर डोळ्यासमोर येतं. पण आता राज ठाकरे यांच्या घराची ओळख बदलली आहे.

‘ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवले’, नवाब मलिकांच्या मुलीचे सोशल मीडियावर खुले पत्र
आजपासून राज ठाकरे हे कृष्णकुंजच्या शेजारी बांधलेल्या पाच मजली इमारतीत राहणार आहे. शिवतीर्थ असे या नवीन घराला नाव देण्यात आलं आहे. खरंतर काही ना काही राजकीय कामांसाठी नेते, कार्यकर्ते नेहमीच कृष्णकुंजवर पाहायला मिळतात. पण हीच गर्दी आता शिवतीर्थावर पाहायला मिळणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: