पॅनकार्डशिवाय खाती उघडली; प्राप्तिकर विभागाने ‘या’ सहकारी बँंकेचे ५३ कोटी गोठवले


हायलाइट्स:

  • पॅनकार्डशिवाय नवीन बँक खाती सुरु केल्याचा ठपका
  • प्राप्तिकर विभागाने एका आघाडीच्या सहकारी बँंकेचे ५३ कोटी गोठवले
  • बँकेचा डेटा आणि सीबीएस प्रणालीची प्राप्तिकर विभागाने तपासणी केली

नवी दिल्ली : पॅनकार्डशिवाय नवीन बँक खाती सुरु केल्याचा ठपका ठेवत प्राप्तिकर विभागाने राज्यातील एका आघाडीच्या नागरी सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. ज्यात बँकेच्या ५३ कोटींच्या ठेवी गोठवल्या आहेत. ही बँक बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट बँक असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेल झालंय स्वस्त ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधनाचा भाव
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शनिवारी या कारवाईची माहिती दिली. बँकेचा डेटा आणि सीबीएस प्रणालीची तपासणी केली असता बँक खाती सुरु करण्यात प्रचंड अनियमितता प्राप्तिकर विभागाला आढळून आली आहे. जवळपास १२०० नवीन खाती ही पॅनकार्ड नसताना देखील सुरु करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले. याशिवाय ही खाती सुरु करताना नियमांचे उल्लंघन केले आहे. केवायसी देखील योग्य प्रकारे केलेलं नाही असे प्राप्तिकर विभागाने म्हटलं आहे.

या प्रत्येक खात्यात १ लाख ९० हजार रुपये जमा करण्यात आले. याचे एकूण मूल्य ५३.७२ कोटी आहे. यापैकी ७०० बँक खाती अशी आहेत जी सुरु झाल्यानंतर आठवडाभरात जवळपास ३४.१० कोटी रुपये जमा करण्यात आहे. हे व्यवहार आॅगस्ट २०२० ते मे २०२१ या काळात झाले आहेत.

मुकेश अंबानींचे लंडनमध्ये घर; रिलायन्स समूहाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण म्हणाले…
दोन लाखांहून अधिक पैसे बँक खात्यात जमा करताना खातेदाराकडे पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे मात्र हे टाळून शिताफिने या खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर बँकांचे मुदत ठेवी योजनेत हे पैसे फिरवण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने केलेल्या तपासात आढळले आहे. याबाबत संबधित बँक खातेदारांची चौकशी केली असता त्यांना याबाबत माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त; २२ राज्य व केंद्रशासित प्रदेशांची दर कपात, महाराष्ट्राकडे लक्ष
याबाबत बँकेच्या अध्यक्षांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. परिणामी प्राप्तिकर विभागाने बँकेच्या ५३ कोटींच्या ठेवी गोठवण्याची कारवाई केली. तसेच बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. २७ आॅक्टोबर २०२१ रोजी ही कारवाई झाली असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: