Big Breaking : नगरमध्ये रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग, १० रुग्णांचा मृत्यू


अहमदनगर : सकाळी साडेदहाच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या icu ला भीषण आग लागली. या ठिकाणी १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत असून साधारण: २० ते २५ जण उपचार घेत होते. भीषण आग लागल्याने परिस्थिती तनाव जनक निर्माण झाली. काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या icu विभागात धाव घेतली.

तातडीने रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. संपूर्ण icu जळून खाक झाले. या भीषण अग्रितांडवात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व रुग्ण वयोवृद्ध आणि व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्यानंतर त्यांना शिफ्ट करत असताना त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले, कॅम्प पोलीस स्टेशनचे शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल आहेत.
Video : आजपासून राज ठाकरे राहणार नव्या घरात, पहा कसं आहे नवं ‘शिवतीर्थ’
सदर घटनास्थळी आमदार संग्राम जगताप दाखल झाले परिस्थितीची पाहणी केली व प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आग लागण्याचे नेमके कारण काय होते फायर ऑडिट झाले की नाही या सर्व प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील घटनेची माहिती घेतली आहे.

अधिक माहितीनुसार, आग ही शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सुरुवातीला अतिदक्षता विभागात बसवलेल्या एसीमधून दूर होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आग वेगाने वाढली. महापालिकेचे अग्निशमन दल आणि एमआयडीसीचे अग्निशमन दल यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान, यासंबंधी विचारले असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा हे माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहेत.
‘ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवले’, नवाब मलिकांच्या मुलीचे सोशल मीडियावर खुले पत्रSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: