Fuel Prices: पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी बिहारवासियांच्या नेपाळमध्ये रांगा!


हायलाइट्स:

  • भारत सरकारकडून इंधनांच्या उत्पादन शुल्कात कपात
  • भाजपशासित राज्यांत राज्य सरकारनंही व्हॅटमध्ये केली कपात
  • तरीदेखील नेपाळपेक्षा भारतात इंधनांच्या किंमती अधिक

रक्सौल, बिहार : केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात केलेल्या कपातीनंतर पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत थोडीफार कपात झाली असली तरी सामान्य सणासुदीच्या दिवसांतही महागाईच्या आगीत होरपळताना दिसत आहेत. याच दरम्यान, भारत आणि नेपाळच्या सीमेवरील नागरिक पेट्रोल भरण्यासाठी थेट नेपाळ गाठत असल्याचं दिसून येतंय.

याचं कारण म्हणजे नेपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भारतापेक्षा खूपच कमी आहेत. त्यामुळे सीमावर्तीय भागातील भारतीय नागरिक इंधन भरण्यासाठी नेपाळच्या पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत.

नेपाळच्या सीमेलगत असलेल्या बिहारच्या रक्सौलमध्ये पेट्रोलचे दर १०७.९२ रुपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ९२.९८ पैसे प्रती लीटर आहेत. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्क तर राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्यानंतर रक्सौलमध्ये इंधनाच्या या किंमती आहेत.

Fuel Prices: ‘भीतीमुळेच भाजपनं घेतला इंधन दरकपातीचा निर्णय, योग्य प्रत्यूत्तर मिळेल’
Bihar: बिहारमध्ये ऐन दिवाळीत विषारी दारुमुळे ३१ जणांनी गमावला जीव

दरम्यान, नेपाळमध्ये पेट्रोल २५.१७ रुपयांनी तर डिझेल २०.९५ रुपयांनी स्वस्त आहे.

रक्सौलच्या बाजुलाच असलेल्या नेपाळ हद्दीतील पर्सा जिल्ह्यात एक लीटर पेट्रोलसाठी नागरिकांना १३२.२५ नेपाळी रुपये अर्थात ८२.६५ भारतीय रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलच्या एका लीटरसाठी ११५.२५ नेपाळी रुपये म्हणजे ७२.०३ भारतीय रुपये मोजावे लागत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, बिहार आणि नेपाळच्या सीमावर्तीय भागांत व्यवहारिकरित्या नेपाळी चलन मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.

Asaduddin Owaisi: ‘नमाज बंद करवून त्याजागी पूजा करणं, हा मुस्लिमांप्रती द्वेष’
VIDEO : निहंग शिखांनी असा साजरा केला ‘बंदी छोड दिवस’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: