मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केलेल्या क्रूज ड्रग पार्टीवरील कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणात आता समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेत हा तपास एनसीपीच्या एका पथकाकडे सोपवण्यात आला आहे. यावर सध्या राजकीय खळबळ सुरू असून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही यात गंभीर आरोप केले. यानंतर आता त्यांची मुलगी निलोफर मलिक-खान हिने सोशल मीडियावर एक पत्र शेअर केलं आहे.
समिर वानखडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतर मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर पत्र शेअर केलं आहे. यातून त्यांनी ‘ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं’ असं लिहित खुले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिने पती समीर खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर खुले पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहे.
अनिल देशमुख आज सुटणार का? ईडी कोठडीचा अखेरचा दिवस, न्यायालयात करणार हजर
निलोफर यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. खरंतर, समीर वानखेडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतर ही निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं होतं. ‘जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा’ असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक ट्विट करत निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर खुले पत्र शेअर केले आहे.
हे पत्र शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी ‘एका निष्पापाच्या पत्नीचे खुले पत्र’ असं म्हणत ‘सुरुवात’ असं लिहिलं आहे. त्यांनी थेट सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे यावर आता विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेची सुट्टी होताच नवाब मलिक म्हणतात…
Source link
Like this:
Like Loading...