फटाक्यांनी बिघडवली ‘हवा’, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये प्रदूषण उचांकी पातळीवर


वृत्तसंस्था, नवी दिल्ली/ लखनौ :

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच दिल्लीलगतच्या परिसरात पराली (शेतातील कचरा) जाळण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी मागील पाच वर्षांतील उचांकी पात्ळीवर पोहोचली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) शुक्रवारी दिलेल्या आकडेवारीनुसार फटाके आणि पराली जाळल्यामुळे मागील चोवीस तासांत दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची सरासरी ४६३ इतकी नोंदविण्यात आली. उत्तर आणि मध्य भारतातील प्रदूषणाची स्थिती गंभीर होती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी अनेक नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. दिल्लीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आल्याने तसेच पराली जाळण्यात आल्याने दिल्ली आणि एनसीआर परिसरात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ३६ टक्क्यांवर पोहोचले. दिल्लीत फुप्फुसांसाठी धेाकादायक असलेल्या पीएम २.५ कणांची मात्रा गुरुवारी २४३ घनमीटर होती. ती शुक्रवारी सकाळी ४१० मायकोग्रॅम घनमीटर झाली. पीएम २.५ चे प्रमाण ६० पर्यंत असल्यास ते मानवासाठी सुरक्षित मानले जाते.

परिणामी दुपारपर्यंत दिल्लीसह ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि नोएडामध्ये धुकेसदृश वातावरण होते. यातील बहुतांश ठिकाणी प्रदूषणाचे निदर्शक असलेल्या ‘एक्यूआय’ची पातळी ४००च्या वरती होती. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ‘एक्यूआय’ची पातळी ४०१ ते ५०० या दरम्यान असेल ती ‘गंभीर’ मानली जाते.

उत्तर आणि मध्य भारतातील आग्रा, बागपत, वृंदावन, वल्लभगड, भिवानी, हिसार, जिंद, पानीपत, रोहतक, अंबाला, जयपूर, जोधपूर, कोटा, ग्वाल्हेर, गोरखपूर यांसारख्या शहरांमध्येही शुक्रवारी ‘एक्यूआय’ची पातळी ‘गंभीर’ श्रेणीत होती, असे सीपीसीबीने सांगितले. यासोबतच पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि हावडा, पंजाबमधील पतियाळा आणि बिहारमधील पाटण्यामध्येसुद्धा खराब ‘एक्यूआय’ नोंदविण्यात आला.

Bihar: बिहारमध्ये ऐन दिवाळीत विषारी दारुमुळे ३१ जणांनी गमावला जीव
Spurious Liquor in Bihar: ‘गडबड चीज पीएंगे तो…’, मुख्यमंत्री नितीश कुमारांचं वक्तव्य वादात
महाराष्ट्राला दिलासा

सीपीसीबीने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये गुरुवारी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक फटाके फोडण्यात आले. मात्र, तरीही तिथे ‘एक्यूआय’ची पातळी मध्यम स्वरूपाची होती. तर नवी मुंबई आणि नाशिकमध्ये ‘एक्यूआय’चा स्तर खराब होता.

राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

दिल्लीतील प्रदूषणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. ‘बंदी असतानासुद्धा भाजपने नागरिकांना फटाके फोडण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे दिल्लीत प्रदूषण वाढले,’ असा आरोप दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केला. तर ‘दिवाळी हा कुठल्याही एका पक्षाचा नव्हे तर हिंदूंचा सण आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही हिंदू आहेत. त्यांना आपले सण साजरे करण्याची परवानगी नाही का,’ असा सवाल दिल्ली भाजपचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदल यांनी केला.

‘बाहेरचे वातावरण योग्य नाही’

दिवाळीनंतर प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, दिल्लीचे वतावरण बाहेर फिरण्यासारखे राहिलेले नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस.रविंद्र भट म्हणाले. पुस्तक प्रकाश कार्यक्रमात ते बोलत होते. आज हा कार्यक्रमच दिलासा देणारा आहे, बाहेर फिरण्यासारखी स्थिती राहिली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Haryana: शेतकरी आंदोलकांना म्हटलं ‘बेरोजगार दारुडे’, भाजप खासदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या
Subrata Mukherjee Death: पश्चिम बंगाल मंत्र्यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन, ममता हळहळल्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: