अनिल देशमुख आज सुटणार का? ईडी कोठडीचा अखेरचा दिवस, न्यायालयात करणार हजर


हायलाइट्स:

  • अनिल देशमुख आज सुटणार का?
  • ईडी कोठडीचा अखेरचा दिवस
  • जामिन मिळणार का?

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची ईडी कोठडी आज संपत आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. २ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने देशमुख यांची आजपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या चौकशीनंतर ईडीने १ नोव्हेंबर रोजी उशिरा अनिल देशमुखांना अटक केली होती.

हे मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. सीबीआयने २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तपास सुरू केला होता. सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता.
आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेची सुट्टी होताच नवाब मलिक म्हणतात…
देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केला आणि निलंबित पोलीस शिपाई सचिन वाजे याच्यामार्फत मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून ४.७० कोटी रुपये गोळा केल्याचा ईडीचा आरोप आहे. देशमुख यांनी यापूर्वी हे आरोप फेटाळले होते आणि एजन्सीचे संपूर्ण प्रकरण पोलीस अधिकाऱ्याने (वाजे) केलेल्या दुर्भावनापूर्ण विधानांवर आधारित असल्याचे म्हटले होते.

या प्रकरणी आणखी दोन जणांना अटक

या प्रकरणी ईडीने संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांनाही अटक केली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पालांडे हे देशमुख यांचे स्वीय सचिव म्हणून काम करत होते, तर शिंदे हे देशमुख यांचे स्वीय सहाय्यक होते.भाऊबीजेच्या दिवशीच रेल्वे स्थानकात तरुणाची हत्या, खून होताना प्रेयसीही होती समोर…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: