गुरुग्राम : गुरुग्राममध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी नमाजावरून वाद सुरू आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १२ मध्ये नियमितरुपात होत असलेला जुम्याचा नमाज बंद करून याच जागेवर गोवर्धन पूजा करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथं होणाऱ्या नमाजावर आक्षेप घेतला होता. नमाज बंद करवून त्याठिकाणी पूजा करण्यात आल्यानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष
असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. ‘मुस्लिमांप्रती हा स्पष्ट द्वेष’ असल्याचं ओवैसी यांनी म्हटलंय.
‘आंदोलनकर्ते किती कट्टरतावादी झालेत, हे गुरुग्राममध्ये शुक्रवारी नमाजाला विरोधाचं उदाहरण आहे. हा मुस्लिमांप्रती स्पष्ट द्वेष आहे. आठवड्यातून एकदा १५-२० मिनिटांसाठी जुम्याचा नमाज अदा करणं कुणाच्या भावना कसं दुखावू शकतं?’ असा प्रश्नही असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे.
VIDEO : निहंग शिखांनी असा साजरा केला ‘बंदी छोड दिवस’
Haryana: शेतकरी आंदोलकांना म्हटलं ‘बेरोजगार दारुडे’, भाजप खासदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या
शुक्रवारी गुरुग्रामच्या सेक्टर १२ मधल्या त्याच पार्कात गोवर्धन पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे जुम्याच्या नमाजावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत हा नमाज बंद करायला भाग पाडलं होतं.
गोवर्धन पूजेच्या वेळी इथं मोठ्या संख्येत पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं. या पूजेत भाजप नेते कपिल मिश्रादेखील सहभागी झाले होते. ‘रस्ते धार्मिक कार्यक्रमांसाठी नसतात’ असं वक्तव्य यावेळी कपिल मिश्रांनी केलं.
यापूर्वी नमाज आणि पूजेसंदर्भात दोन्ही पक्षांसोबत पोलीस प्रशासनानं बैठक घेतली होती. पूजा आणि नमाज दरम्यान पोलीस अतिशय दक्ष होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनसार, सगळे सोपस्कार शांतीपूर्ण पद्धतीनं पार पडले.
फटाक्यांनी बिघडवली ‘हवा’, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये प्रदूषण उचांकी पातळीवर
Spurious Liquor in Bihar: ‘गडबड चीज पीएंगे तो…’, मुख्यमंत्री नितीश कुमारांचं वक्तव्य वादात