हायलाइट्स:
- पंजाबच्या अमृतसरमध्ये दिसल्या करामती
- बंदी छोड दिवस उत्साहात साजरा
- खेळ पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
याचा एक व्हिडिओ न्यूज एजन्सी एएनआयनं शेअर केला आहे. व्हिडिओत निहंग शिख घोडेस्वारीसोबतच अनेक करामती करताना दिसत आहेत.
व्हिडिओत दिसत असलेल्या दृश्यानुसार काही शीख घोड्यांवर उभ्यानंच स्वार झालेत. तर काही जण घोड्यांवर बसून काठ्या – तलवारींचा खेळ सादर करत आहेत. बाजुला उपस्थित असलेली गर्दी त्यांना यासाठी प्रोत्साहन देताना दिसत आहे.
शिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांची ग्वालियर किल्यातून सुटका करण्यात आली होती. हाच दिवस बंदी छोड दिवस म्हणून साजरा केला जातो.
यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही दिवाळी आणि बंदी छोड दिवस साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘आपल्या सर्वांच्या कठीण वेळेनंतर ही दिवाळी आणि बंदी छोड दिवस वास्तवत: विशेष आहे’, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलंय.