हायलाइट्स:
- विजेच्या तारेचा धक्का लागून आजी-आजोबांसह नातवाचा मृत्यू.
- दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील हृदयद्रावक घटना.
- दिवाळी पाडव्याच्या दिवाशीच सुरदसे कुटुंबावर आघात.
वाचा:संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दणका; आता दिले ‘हे’ निर्देश
मारोती चंद्रभान सुरदसे (७०), मणकर्णा मारोती सुरदसे (६५), नातू सुमित विनोद सुरदसे (१७) अशी विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. यासंदर्भात डोल्हारी येथील पोलीस पाटलांनी घटनेची प्राथमिक माहिती दारव्हा पोलीस व महसूल प्रशासनाला दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. दिवाळी पाडव्याच्या दिवाशीच एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वाचा: पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रातही घटणार?; पवारांनी केले मोठे विधान
नेमकं काय घडलं?
मारोती सुरदसे यांचे घनापूर रस्त्यावरच शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी या हंगामात हरभऱ्याची पेरणी केली आहे. या पिकाला पाणी देण्यासाठी आज सकाळी ते शेतात गेले होते. त्यांच्यासह पत्नी मणकर्णा व नातू सुमित हेसुद्धा होते. दरम्यान, पंप सुरू करण्यासाठी मारोती हे गेले असता तिथे असलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना वाचविण्यासाठी पत्नी मनकर्णा यांनी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. आजी-आजोबांना जमिनीवर पडलेले पाहून शेतात असलेला नातू सुमित हासुद्धा धावत गेला. आजी-आजोबांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही विजेचा धक्का लागला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दारव्हा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
वाचा: समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला