आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे; मात्र, वानखेडेही असतील टीमचा भाग


हायलाइट्स:

  • आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे.
  • मात्र, समीर वानखेडे हे देखील असतील तपास पथकाचा भाग.
  • कोणत्याही अधिकाऱ्याला या तपासापासून दूर केलेले नाही- दिल्ली एनसीबी.

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरणासह मुंबई एनसीबी करत असलेल्या एकूण ६ प्रकरणांचा तपास आता प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात न होता, तो आता दिल्ली एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंग यांच्या नेतृत्वात होणार आहे. दिल्ली एनसीबीने हे स्पष्टीकरण दिले आहे. ही सहा प्रकरणे समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना या प्रकरणांच्या तपासातून बाजूला काढण्यात आलेले नसल्याचे दिल्ली एनसीबीने स्पष्ट केले आहे. (deputy director of ncb operation wing sanjay singh will lead the ncb team to investigate aryan khan drug case sameer wankhede will be in team)

दिल्ली एनसीबीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता समीर वानखेडेसह त्यांच्या तपास पथकातील सर्व अधिकारी या प्रकरणांशी संबंधित असले तरी आता ते आयपीएस संजय सिंह यांच्या निर्देशांचे पालन करतील हे स्पष्ट झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- Breaking News! समीर वानखेडेंकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला

वानखेडे यांच्याकडून या प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उपमहासंचालकांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सध्याच्या या प्रकरणांमधील जबाबदारीतून एकाही अधिकाऱ्याला हटवले गेलेले नाही. हे सर्व अधिकारी ऑपरेशन विंगच्या तपास पथकाला मदत करतील, असे दिल्ली एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच वेळी, एनसीबीचे दक्षिण पश्चिम क्षेत्राचे उपमहानिदेशक मुथा अशोक जैन म्हणाले की, आता दिल्लीची टीम आमच्या झोनमधील आर्यनसह एकूण ६ प्रकरणांची चौकशी करेल.

क्लिक करा आणि वाचा- ‘नारायण राणे यांनी बाळासाहेब, सोनिया गांधी, पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला’

समीर वानखेडे हे ड्रग्जची बनावट प्रकरणे तयार करून वसुली करत असल्याचा गंभीर आरोप वानखेडेंवर करण्यात आला आहे. तसेच त्यांनी बनावट जातीचा दाखला तयार करून नोकरी मिळवली असल्याचा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपांमुळे वानखेडे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे आपले म्हणणे मांडले आहे. या सर्व आरोपप्रकरणाचा एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी तपास करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’; सोमय्यांचा गंभीर आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: