धक्कादायक! फटाक्यांच्या वादातून महिलेचा विनयभंग


हायलाइट्स:

  • फटाके फोडण्याच्या वादाची परिणती एका महिलेच्या विनयभंगात झाली.
  • ही धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
  • या खेरीज फटाके फोडण्याच्या वादातून मारहाणीच्या दोन घटना नागपुरात घडल्या.

नागपूर: फटाके फोडण्याच्या वादाची परिणती एका महिलेच्या विनयभंगात झाल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. संदीप जोशी (३६) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या परिसरातील एका महिलेसोबत त्याचा फटाक्यांवरून वाद झाला. यावेळी त्याने या महिलेचे विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. (the woman has been molested over an argument over fireworks in nagpur)

फटाके फोडण्यावरून मारहाणीच्या दोन घटना

तर, फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून मारहाणीच्या दोन घटना शहरात घडल्या. यातील पहिली घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसरात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कौशिक धनराज सोमकुंवर (२०) असे फिर्यादीचे तर साहील विक्रम उबाळे (१८) असे आरोपीचे नाव आहे. कौशिक फटाके फोडत होता. मात्र, आरोपी साहील त्याला शिवीगाळ करू लागला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेला. त्यानंतर चिडलेल्या साहीलने रस्त्यावरील दगड उचलून कौशिकला मारहाण केली.

क्लिक करा आणि वाचा- Breaking News! समीर वानखेडेंकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला

याखेरीज, दुसरी घटना जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेताजी चौक परिसरात घडली. महेश रुपलाल भोटानी आणि राकेश शर्मा यांच्यात हा वाद झाला. राकेश हा भोटानी यांच्या घरासमोर फटाके फोडत होता. यावेळी महेशचा भाऊ नरेश याने त्यावर आक्षेप घेतला. घरासमोर फटाके फोडू नको असे नरेश याने राकेश याला सांगितले. यावरून त्यांच्याच वाद झाला. हा वाद वाढत गेला.

क्लिक करा आणि वाचा- दीपावली पाडव्याला राज्याला मोठा दिलासा; करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत मोठी घट

त्यानंतर राकेश आणि त्याच्या अन्य तीन मित्रांनी महेश आणि नरेश यांना मारहाण केली. तसेच भोटानी बंधूनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार राकेशने केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘नारायण राणे यांनी बाळासाहेब, सोनिया गांधी, पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: