दीपावली पाडव्याला राज्याला मोठा दिलासा; करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत मोठी घट


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ८०२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ८८६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण १७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात आज दीपावली पाडव्याच्या दिवशी राज्यातील जनतेला दिलासा मिळाला असून करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. आज मृत्यूसंख्येतही घट झाली असून एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ८०२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या १ हजार १४१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ८८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार १६३ इतकी होती. तर, आजही १७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३२ इतकी होती. (maharashtra registered 802 new cases in a day with 886 patients recovered and 17 deaths today)

आज राज्यात झालेल्या ३२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ५७ हजार १४९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- Breaking News! समीर वानखेडेंकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला

मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजार ९५९ इतकी आहे. काल ही संख्या १५ हजार ४८५ इतकी होती. या बरोबरच राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा विचार करता सर्वात जास्त रुग्णवाढ आज मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाली आहे. मुंबईत एकूण २३६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात १९६ नवे रुग्ण वाढले आहेत. तर अहमदनगरमध्ये ही संख्या १०३ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘नारायण राणे यांनी बाळासाहेब, सोनिया गांधी, पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला’

त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण ९१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. पालघरमध्ये २२ आणि रायगडमध्ये ही संख्या १५ इतकी आहे.

नाशिकमध्ये २८, सोलापुरात २८, साताऱ्यात ही संख्या २८, कोल्हापुरात ३, सांगलीत ५ तर रत्नागिरीत २ रुग्णांची वाढा झाली आहे.

तसेच औरंगाबादमध्ये आज १६ नवे रुग्ण आढळले असून जालना, हिंगोली आणि परभणीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

तर, लातूरमध्ये ४, उस्मानाबादमध्ये ८, बीडमध्ये ६ आणि नांदेडमध्ये १ रुग्ण आढळला आहे. अकोल्यात २, यवतमाळ,बुलडाणा आणि वाशिममध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

तसेच नागपूरमध्ये २ रुग्ण आढळले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’; सोमय्यांचा गंभीर आरोप

१,४९,१२६ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ३१ लाख ०४ हजार ८७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख १६ हजार १०१ (१०.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४९ हजार १२६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: