भारताने स्कॉटलंडच्या संघाचा उडवला खुर्दा, टीम इंडिया दणदणीत विजय मिळवण्यासाठी झाली सज्जदुबई : महत्वाच्या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ आज भारतीय संघाने दाखवून दिला. रवींद्र जडेजाने तीन विकेट्स मिळवत स्कॉटलंडचे कंबरडे मोडले. त्यामुळेच भारतीय संघाने स्कॉटलंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताने स्कॉटलंडला या सामन्यात ८५ धावांमध्येच ऑलआऊट केले आणि रनरेट वाढवण्यासाठी भक्कम पाऊल टाकले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्यचाा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी कोहलीचा निर्णय कसा योग्य आहे, हे आपल्या कामगिरीतून दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी स्कॉटलंडला तिसऱ्या षटकात पहिलाच धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद शमीने स्कॉटलंडच्या दुसऱ्या सलामीवीराला बाद केले. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यावर रवींद्र जडेजाने स्कॉटलंडच्या संघाला तिहेरी धक्के दिले. जडेजाने यावेळी स्कॉटटलंडच्या मधल्या फळीतील तीन फलंदाजांना स्वस्तात बाद केले आणि भारताला घवघवीत यश मिळवून दिले. भारताने स्कॉटलंडचा अर्धा संघ गारद केला तेव्हा त्यांची ५ बाद ५८ अशी अवस्था झाली होती. जडेजाना या सामन्यात चार षटकांमध्ये फक्त १५ धावा देत तीन विकेट्स पटकावल्या. जडेजानंतर भारताचा दुसरा फिरकीपटू आर. अश्विनने स्कॉटलंडला सहावा धक्का दिला. भारताच्या गोलंदाजांची एकामागून एक ठराविक फरकाने न्यूझीलंडच्या संघाला धक्के दिले. त्यामुळेच स्कॉटलंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कारण स्कॉटलंडचा एकही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर टीकून राहू शकला नाही. त्यामुळे या सामन्यात स्कॉटलंडला चांगल्या भागीदाऱ्याही करता आल्या नाहीत.

भारतासाठी आजचा सामना फार महत्वाचा होता. त्यामुळेच आजच्या सामन्यासाठी भारतीय संघातून शार्दुल ठाकूरला डच्चू दिला आहे. कारण आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये शार्दुलला चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. शार्दुलच्या जागी भारतीय संघात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. स्कॉटलंडचे फलंदाज फिरकी गोलंदाजी चांगली खेळू शकत नाही, हे पाहत भारताने आजच्या सामन्याच तीन फिरकीपटूंना खेळण्याचे ठरवले होते. या गोष्टीचा फायदा भारतीय संघाला झाल्याचे पाहायला मिळाले. कारण वरुण चक्रवर्तीने पहिल्याच तीन षटकांमध्ये फक्त १५ धावा देत अचूक गोलंदाजीचा नमुना पेश केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: