हायलाइट्स:
- दिल्ली एनसीबीचा समीर वानखेडे यांना धक्का
- आर्यन खान प्रकरणासह ६ प्रकरणांचा तपास वानखेडेंकडून काढून घेतला.
- एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी दिली माहिती.
दरम्यान, आपल्यावर विविध प्रकारचे आरोप होत असल्याने हा तपास आपल्याकडून काढून घेण्यात यावा अशी आपणच मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वानखेडे यांचे म्हणणे असल्याचे समजते. आता हा तपास नवे विभागीय संचालक संजय सिंह हे करणार आहेत.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबरोबरच अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे प्रकरणही समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘नारायण राणे यांनी बाळासाहेब, सोनिया गांधी, पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला’
मुंबई एनसीबीने मुंबईतील समुद्रात कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर २ ऑक्टोबर या दिवशी छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र या कारवाईवर संशय व्यक्त होत एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या गंभीर स्वरुपाचे आरोप होण्यास सुरुवात झाली आणि ही संपूर्ण कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली. लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल करण्याची वानखेडे यांची पद्धत असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर केला आहे. तसेच त्यांचे जात प्रमाणपत्रही खोटे असल्याचा त्यांचा आरोप आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’; सोमय्यांचा गंभीर आरोप
हे आरोप होत असतानाच मुंबई एनसीबीचे पंच साक्षीदार यांनीही या प्रकरणी खंडणीचे आरोप केल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे आणि संशयाचे बनले होते.
दरम्यान, अनेक गंभीर आरोपांनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीकडून खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी एसआयटीची स्थापनाही केली आहे. शिवाय वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील अहवाल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने देणे बाकी आहे. या दरम्यान, समीर वानखेडेंकडून हा तपास काढून घेण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- सण झाला गोड! पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भरवला फराळ