क्रिप्टो करन्सी झाले स्वस्त ; जाणून घ्या आज कोणकोणत्या चलनांमध्ये झाली घसरण


हायलाइट्स:

  • क्रिप्टो करन्सी बाजारात बिटकॉइनसह प्रमुख चलनांच्या किमतीत घसरण झाली.
  • आज बिटकॉइनचा भाव १ टक्क्याने घसरला.
  • इथेरियम आणि इतर कॉइनमध्ये देखील घसरण झाली.

मुंबई : नफावसुलीमुळे आज शुक्रवारी जागतिक क्रिप्टो करन्सी बाजारात बिटकॉइनसह प्रमुख चलनांच्या किमतीत घसरण झाली. बिटकॉइनचा भाव १ टक्क्याने घसरला. तर इथेरियम आणि इतर कॉइनमध्ये देखील घसरण झाली.

मुकेश अंबानींनाही ‘सेकंड होम’ची भुरळ! ‘या’ देशात ३०० एकर प्राॅपर्टी केली खरेदी, नव्या घरी दिवाळीचा जल्लोष
भारतात क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता नसली तरी ही बाजारापेठ वेगाने वाढत आहे. बिटकॉइन, इथेरियम या लोकप्रिय क्रिप्टो करन्सींप्रमाणे छोट्या क्रिप्टो करन्सी देखील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत.

फास्टफूड क्षेत्रात गुंतवणूक संधी; सफायर फूड्स इंडिया लिमिटेडचा २०७३ कोटींचा IPO
आज बिटकॉइनचा भाव १ टक्क्यांनी कमी होऊन ६१९४६ डॉलर झाला. गेल्या महिन्यात बिटकॉइनने ६७००० डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. बिटकॉइनमध्ये चालू वर्षात ११४ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात बिटकॉइनने ६५००० डॉलरचा टप्पा ओलांडला होता. बिटकॉइननंतर दुसरा लोकप्रिय असलेल्या इथेरियमच्या किमतीत १ टक्का घसरण झाली आहे. एका इथेरियम कॉइनचा भाव ४५३१ डॉलर इतका आहे. डोजेकॉइन ३ टक्क्यांनी घसरून ०.२६ डॉलर इतका झाला.

सकारात्मक सुरवात; लक्ष्मीपूजनानंतर सोने-चांदीला तेजीची झळाळी, जाणून घ्या आजचा भाव
मागील २४ तासात एक्सआरपी, कार्डानो, युनीस्वॅप, लिट्टेकाॅइन, पोलकॅडोट या क्रिप्टो करन्सीमध्ये देखील घसरण झाली आहे. मागील काही सत्रांमध्ये चर्चेत आलेल्या शिबू इनू या क्रिप्टो करन्सीमध्ये २३ टक्के घसरण झाली आहे. एका शिबू इनू कॉइनचा भाव ०.००००४६ डॉलर आहे. दुसऱ्या बाजूला सोलाना , बिनान्स कॉइन आणि तिथेर या कॉइनमध्ये किरकोळ वाढ झाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: