हायलाइट्स:
- विषारी दारू पिल्यानं नागरिकांनी गमावले प्राण
- गोपाळगंजमध्ये २० जणांचा मृत्यू
- बेतियामध्ये ११ जणांनी गमावले प्राण
गोपाळगंज भागात २० जणांचा मृत्यू झाला आहेत तर पश्चिम चंपारण जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या बेतियाच्या तेलहुआ गावात आत्तापर्यंत ११ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर विषारी दारुमुळे अनेकांची दृष्टी निकामी झालीय. यापूर्वी गेल्या आठवड्यात मुजफ्फरपूरमध्ये दारू पिल्यानंतर सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
सत्ताधारी – विरोधकांची जुंपली
बिहारमधले विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी या मृत्यूंसाठी नितीश कुमार सरकारला जबाबदार धरलंय. ‘विषारी दारुमुळे बिहारमध्ये दिवाळीच्या दिवशी सरकारमुळे ३५ हून अधिक लोक मारले गेले. कुणाच्या तरी सनकेमुळे बिहारमध्ये लागू करण्यात आलेली दारुबंदी केवळ कागदांपुरती आहे. अन्यथा खुली सूट आहे कारण काळ्याधंद्यात मौज आणि लूट सुरूच आहे’, असं ट्विट तेजस्वी यादव यांनी केलंय.
हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बिहारचे कॅबिनेट मंत्री जनक राम गोपाळगंजमध्ये दाखल झाले. राज्यातील अवैध दारुविक्री संदर्भात सरकारवरील आरोपांचं खंडण करताना ‘एनडीए सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांनी रचलेला हा डाव’ असल्याचं त्यांनी म्हटलंय.