स्कॉटलंडविरुद्ध होणाऱ्या लढती आधी भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा एक व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने अनेक गोष्टीबद्दलची त्याची मते व्यक्त केली आहेत. रोहितच्या मते जर तुम्ही विजेतेपद मिळवले नाही तर तुमच्या शतकाला आणि केलेल्या धावांना काहीही अर्थ उरत नाही.
वाचा- Video: हॅट्रिक चेंडूवर कॅच सोडला; गोलंदाजाने सुनावले आणि माफी मागायला लावली
हिटमॅन रोहितच्या मते क्रिकेटमध्ये व्यक्तीपेक्षा संघाचे काम अधिक महत्त्वाचे असते. जर एखाद्या स्पर्धेत माझ्या संघाने विजेतेपद मिळवले नाही तर मी केलेल्या धावा आणि शतक याचा काही उपयोग होत नाही. अगदी प्रामाणीकपणे बोलायचे तर त्या धावा आणि शतकांना काही अर्थ उरत नाही. आयसीसीच्या व्हिडिओत भारताचा उपकर्णधार रोहित म्हणाला की, मी नेहमी स्वत: पेक्षा संघाला नेहमी पुढे ठेवल्याने करिअर पुढे घेऊन जाऊ शकलो.
वाचा- आव्हान संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिजला बसला मोठा झटका; या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती
२०१६ पासून ते आतापर्यंत मला मोठा अनुभव मिळाला. एक फलंदाज म्हणून २०१६च्या तुलनेत मी अधिक परिपक्व झालो आहे. खेळाची गरज, संघाला आता काय हव आहे. प्रत्येक शॉट खेळताना याची आता संघाला गरज आहे का याचा विचार करतो, असे रोहितने सांगितले. सलामीच्या फलंदाजांबद्दल बोलताना रोहित म्हणाला, जेव्हा तुम्ही डावाची सुरूवात करता तेव्हा तुम्हाला जास्ती जास्त चेंडू खेळण्याची संधी असते. तुम्हाला अधिक धावा करता येतात. यामुळेच टी-२० मध्ये अधिकतर शतक ही पहिल्या ३ फलंदाजांनी केली आहेत. माझे काम तेच असते.