आव्हान संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिजला बसला मोठा झटका; या दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती


अबुधाबी: दोन वेळा आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला या वर्षी मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. विद्यमान विजेत्या वेस्ट इंडिजला ग्रुप फेरीतील चार पैकी एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. काल गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने त्यांचा २० धावांनी पराभव केला आणि वेस्ट इंडिजचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले.

वाचा- विद्यमान विजेते वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीत गारद; श्रीलंकेने दिला झटका

वेस्ट इंडिजला या पराभवासोबत आणखी एक धक्का बसला, संघातील सर्वात अनुभवी ऑलाराउंडर ड्वेन ब्रावोने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघाच्या या पराभवानंतर निराश झालेल्या ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजची अखेरची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. ही लढत ब्रावोची अखेरची आंतरराष्ट्रीय लढत असेल.

वाचा-कॅच पकडला नाही म्हणून स्वत:च्या संघातील खेळाडूला घातल्या शिव्या, पाहा व्हिडिओ

मला वाटते की निवृत्तीची वेळ आली आहे. क्रिकेट मैदानावर माझे करिअर फार चांगले राहिले. माझ्या संघासाठी मी १८ वर्षात अनेक चढ उतार पाहिले. संघाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी खुप आभारी आहे. इतक्या वर्षात कॅरेबियन चाहत्यांनी मला जे प्रेम दिले त्यासाठी मनापासून आभारी, असे ब्रावोने म्हटले आहे.

वाचा- खळबळजनक आरोप; विराट कोहलीने MS धोनीचे ऐकले नाही, कोणी त्याच्या विरोधात…

वेस्ट इंडिजने याआधी जिंकलेल्या २०१२, २०१६च्या टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघात ब्रावो होता. ब्रावोने वेस्ट इंडिजकडून ४० कसोटीतील ७१ डावात ३१.४च्या सरासरीने २ हजार २०० धावा केल्या. तर १६४ वनडेत २५.४च्या सरासरीने २ हजार ९६८ धावा केल्या. टी-२० मध्ये त्याने ७३ सामन्यात २२.२च्या सरासरीने १ हजार २४५ धावा केल्या. गोलंदाजीत त्याने कसोटीत ८६, वनडेत १९९ तर टी-२० मध्ये ७८ विकेट घेतल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: