फास्टफूड क्षेत्रात गुंतवणूक संधी; सफायर फूड्स इंडिया लिमिटेडचा २०७३ कोटींचा IPO


हायलाइट्स:

  • सफायर फूड्स इंडिया लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव ९ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होणार
  • प्रती शेअर १,१२० रुपये ते १,१८० रुपये असा किंमत पट्टा निश्चित
  • आयपीओ ९ नोव्हेंबर २०२१ ते ११ नोव्हेंबर, २०२१ या काळात खुला राहणार

मुंबई : केएफसी आणि पिझा हट या फूड चेन ऑपरेट करणाऱ्या सफायर फूड्सकडून प्राथमिक बाजारात समभाग विक्री करून २०७३ कोटी उभारले जाणार आहेत. फायर फूड्सचे भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये ४३७ रेस्तरॉं आहेत. आयपीओ ९ नोव्हेंबर, २०२१ रोजी खुला होणार आहे. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी बंद होईल. या प्रस्तावासाठी दरश्रेणी प्रति इक्विटी समभाग १,१२० रुपये ते १,१८० रुपये यांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. किमान १२ इक्विटी समभाग आणि त्यानंतर १२च्या पटीतील इक्विटी समभागांसाठी बोली लावली जाऊ शकेल.

केंद्राची इंधनावर शुल्क कपात; पेट्रोल-डिझेल दरांबाबत आज कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावामध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या १७,५६९,९४१ इक्विटी समभागांच्या (“इक्विटी शेअर्स”) विक्रीचा प्रस्ताव आहे. यात क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्टचे ८५०,००० इक्विटी शेअर्स, सफायर फूड्स मॉरिशस लिमिटेडचे (क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्टसोबत “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”) ५,५६९,५३३ डब्ल्यूडब्ल्यूडी रुबी लिमिटेडचे ४,८४६,७०६ इक्विटी समभाग, अॅमिथिस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ३,९६१,७३७ इक्विटी समभाग, एएजेव्ही इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे ८०,१६९ इक्विटी समभाग, एडलवाइज क्रॉसओव्हर ऑपॉर्च्युनिटीज फंड्सचे १,६१५,५६९ इक्विटी समभाग, एडलवाइज क्रॉसओव्हर ऑपॉर्च्युनिटीज फंड- सीरिज टूमधील ६४६,२२७ फंड्स (डब्ल्यूडब्ल्यूडी रुबी लिमिटेड, अॅमिथीस्ट प्रायव्हेट लिमिटेड, एएजीव्ही इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि एडलवाइज क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटी फंड् यांच्यासह “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स”) यांचा समावेश आहे.

शेअर बाजारात तेजीची आतषबाजी ; मुहूर्ताला सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला
या समभाग विक्रीत एक तृतीयांश अँकर इन्व्हेस्टर पोर्शन देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवला जाईल आणि हे देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून, अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन दराला किंवा त्याहून अधिक दराला, प्राप्त झालेल्या वैध बोलीच्या अधीन असेल. ५ टक्के क्यूआयबी पोर्शन (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणबद्ध पद्धतीने वितरणासाठी उपलब्ध असेल आणि उर्वरित क्यूआयबी पोर्शन सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांच्या (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता अन्य) आधारे प्रमाणबद्ध पद्धतीने वितरणासाठी उपलब्ध असेल.

इथं मिळेल बचतीवर सर्वाधिक परतावा ; देशातील या लघु वित्त बँंका देतात इतक व्याज
यामध्ये ऑफर प्राइसला किंवा त्याहून अधिक किंमतीला वैध बोली लावणाऱ्या म्युच्युअल फंडांचा समावेश होतो. मात्र, म्युच्युअल फंडांकडून झालेली एकत्रित मागणी क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांहून कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनमधील उर्वरित इक्विटी समभाग प्रमाणबद्ध रितीने क्यूआयबींना वितरणासाठी उपलब्ध होतील. इक्विटी समभाग बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: