४ वर्षांनी टीम इंडियात परतला अश्विन; रोहित शर्मा म्हणाला, ‘त्याचं संघात असणं…’


दुबई : टी-२० विश्वचषकात पहिले दोन सामने गमावल्याने भारतीय क्रिकेट संघावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. दुसरीकडे या वेळी वारंवार एक नाव चर्चेत येत होते, ते म्हणजे रविचंद्रन अश्विन. मिस्ट्री स्पिनर म्हणून वरुण चक्रवर्तीला अश्विनच्या जागी संधी देण्यात आली होती, पण अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अश्विनला संधी मिळाली. वरुण जखमी असल्याने मिळालेल्या संधीचा अश्विनने चांगला फायदा करून घेतला. आणि चार षटकात १४ धावा देत दोन बळी घेतले. अश्विनच्या कामगिरीवर संघाचा उपकर्णधार रोहित शर्माही आनंदी आहे. रविचंद्रन अश्विनची प्लेइंग इलेव्हनमध्ये उपस्थिती नेहमीच संघाला फायदेशीर ठरते, कारण हा अनुभवी ऑफस्पिनर नेहमीच विकेटच्या शोधात असतो, अशी स्तुतीसुमने रोहितने अश्विनवर उधळली आहेत.

वाचा- Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video

या सामन्यापूर्वी अश्विनने २०१७ मध्ये भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळला होता. चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणाऱ्या अश्विनने आपण संघासाठी किती महत्वाचे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, “तो एक महान गोलंदाज आहे, यात शंका नाही. त्याने इतके क्रिकेट खेळले आहे आणि अनेक विकेट्स घेतल्या आहेत. तीन किंवा चार वर्षांनी तो मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याच्यासाठी हे आव्हान असणार आहे, हे त्याला माहीत होते.”

वाचा- भारताला विश्वविजेता बनविणारा कर्णधार खेळणार ऑस्ट्रेलियाच्या संघातून; फिंचसोबत उतरणार मैदानात

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी
अश्विन आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० खेळत नसला तरी आयपीएलमध्ये तो धमाल करत होता. याआधी तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि आता तो दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून खेळत आहे. रोहित म्हणाला की, “तो नेहमी विकेटच्या शोधात असतो आणि त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे फायदेशीर आहे. त्याला त्याची गोलंदाजी चांगलीच समजते आणि आशा आहे की, तो भविष्यातही आमच्यासाठी अशीच गोलंदाजी करत राहील.”

भारत-पाक फायनलविषयी विचारले असता रोहित म्हणाला…

सेमीफायनलचा रस्ता सध्या भारतासाठी अवघड आहे, पण भारत-पाकिस्तान फायनलच्या शक्यतेबद्दल विचारल्यावर रोहित म्हणाला, “तुम्ही फायनलबद्दल बोलत आहात, जो रस्ता आमच्यासाठी अजून लांब आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल, हे पाहावं लागेल. आम्ही अजून इतका पुढचा विचार करत नाही. आम्हाला पुढील सामन्याचा विचार करावा लागेल आणि त्यानंतर अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यामुळे फायनल हे अजून दूरचे स्वप्न आहे.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: