seperate reservation to nomadic tribes :भटक्या जमातींना स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य


मुंबई: देशातील घुमंतू समुदायाला, म्हणजेच भटक्या जमातींना (Nomadic Tribes) इतर मागासवर्गीय (Other Backward Class) श्रेणीबाहेर आरक्षण (Reservation) मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून केंद्र सरकार या जमातींना आरक्षण देण्याचा विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली आहे. देशातील भटक्या जमातींच्या समाजिक स्थितीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बी. आर. इदाते समितीच्या अहवालाचा विचार करत असल्याचेही आठवले म्हणाले. (union govt is thinking to give reservation outside obc to nomadic tribes says union minister ramdas athawale)

क्लिक करा आणि वाचा- ‘दिवाळीनंतर बॉम्ब’, या वक्तव्यावरून रोहित पवारांचा फडणवीस यांना जोरदार टोला

केंद्र सरकार इदाते समिच्या अहवालाचा गंभीरपणे विचार करत आहे. तसेच या समितीने केलेल्या शिफारशींचा अतिशय बारकाईने अभ्यास केला जात आहे. यानंतर भटक्या जमातींना इतर मागासवर्ग श्रेणीबाहेरील आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने आता लवकरच निर्णय होईल असे वाटते असे आठवले यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जातील हे हास्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा टोला

भटक्या जमातींना ओबीसींच्या बाहेर आरक्षण देण्यासाठी इदाते समितीने समितीने सुमारे १० टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे. मात्र यावर अजूनही कोणता निर्णय घेण्यात आलेला नसून मंत्रालय अद्याप या अहवालातील शिफारशींचा अभ्यास करत आहे, असे आठवले पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू नका, अन्यथा…’; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आठवले म्हणाले की, भटक्या जमातींबाबत बालकिशन रंके समितीने देशभरात सर्वेक्षण केले आहे. भटक्या जमातींची नेमकी स्थिती कशी आहे यावर समितीने पाहणी केली आहे. भटक्या जमीतीची मुले शिक्षणापासून वंचित असल्याचेही समितीने दाखवून दिले आहे. देशातील अशा या भटक्या जमातींना वेगळे आरक्षण देता येईल का, याचाही अभ्यास सुरू आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: